आई मला शेवटचं बघून घे… युद्धात अडकलेल्या 169 हिंदुस्थानींना वाचवणाऱ्या महिला पायलटची कहाणी
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अडकलेल्या 169 हिंदुस्थानी नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात हिंदुस्थानी महिला पायलट दीपिका अधना यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अत्यंत धोकादायक परिस्थितीत विमान उडवत त्यांनी हिंदुस्थानींना सुरक्षितपणे मायदेशी आणले. त्यांच्या धाडस आणि कौशल्यामुळे ही मोहीम यशस्वी ठरली असून देशभरातून त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे अनेक हिंदुस्थानी नागरिक तेथे अडकले होते. परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने हिंदुस्थानींना सुरक्षित बाहेर काढणे हे मोठे आव्हान बनले होते. अशा वेळी हिंदुस्थानी दूतावास आणि विमान कंपनीने विशेष उड्डाणाची व्यवस्था केली.
या मोहिमेसाठी पायलट म्हणून दीपिका अधनाची निवड करण्यात आली. त्या वेळी त्या भागात हवाई हल्ल्यांचा धोका, अस्थिर वातावरण आणि सुरक्षेच्या अनेक अडचणी होत्या. अशा परिस्थितीत विमान उडवणे हे अत्यंत धाडसाचे काम मानले जाते. दीपिका अधना यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अत्यंत शांतपणे आणि कौशल्याने विमानाचे संचालन केले. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्यांनी योग्य मार्ग आणि वेळ निवडून उड्डाण केले. या संपूर्ण प्रवासात त्यांनी अत्यंत दक्षता घेतली. शेवटी हे विमान सुरक्षितपणे भारतात उतरले आणि सर्व 169 भारतीय नागरिक सुखरूप परतले. विमानतळावर पोहोचल्यावर प्रवाशांनी दिलासा व्यक्त करत पायलटचे आभार मानले.
या धाडसी मोहिमेनंतर समाज माध्यमांवर आणि विविध स्तरांवरून दीपिका अधना यांचे कौतुक होत आहे. अनेकांनी त्यांना खऱ्या अर्थाने ‘हिरो’ म्हटले असून संकटाच्या काळात दाखवलेल्या धैर्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे. दीपिका अधानाने सांगितले की, तिला या मोहिमेवर जायचं आहे हे कळल्यावर, तिने प्रथम तिच्या कुटूंबाला याबद्दल सांगितले. ती म्हणाली, आई मला शेवटचे बघून घ्या.. काय माहीत पुन्हा भेट होईल की नाही… असे असूनही तिच्या कुटुंबाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांनी त्याला धैर्याने आणि जबाबदारीने वागण्यास प्रोत्साहित केले.
विमान सुरक्षित उतरल्यावर अनेक प्रवाशांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या. काही प्रवाशांनी सांगितले की त्या कठीण परिस्थितीत मायदेशी परत येण्याची आशा कमी झाली होती. मात्र पायलटच्या धाडसामुळे त्यांना सुरक्षित परत येता आले. दीपिका अधना यांची ही कामगिरी महिलांसाठीही प्रेरणादायी ठरली आहे. विमानवाहतुकीसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात महिलाही उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले.
Comments are closed.