आईचे शेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध; मुलाला आधीपासून संशय; समजावूनही ऐकेना, दोघांना नको त्या अवस्थेत प
हरियाणा: हरियाणातील सिरसा येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या आई आणि तिच्या प्रियकराची हत्या (Crime News)केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे, नंतर त्याने त्या दोघांचेही मृतदेह स्वतः पोलिस स्टेशनला नेले. त्याने पोलिसांना मृतदेह गाडीतून काढण्यास सांगितले. त्या तरुणाच्या वक्तव्याने पोलिसांना धक्का बसला. त्यांनी गाडी उघडली तेव्हा त्यांना आत एक महिला आणि एका पुरूषाचे मृतदेह (Crime News) आढळून आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.(Crime News)
काल (गुरुवारी, ता २७) रात्री त्या तरुणाने त्याची आई आणि त्यांचा शेजारी यांना रंगेहाथ पकडले आणि रागाच्या भरात त्याने दोघांचीही स्कार्फने गळा आवळून हत्या .(Crime News) केली. मृत महिलेची ओळख ४२ वर्षीय अंगूरी देवी आणि तिचा ४५ वर्षीय प्रियकर लेखराज अशी झाली आहे..(Crime News)
Crime News: माझ्या आईचे शेजाऱ्याशी अवैध संबंध…
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदरपूर जिल्ह्यात, राजकुमार नावाच्या एका तरुणाने गुरुवारी रात्री त्याच्या आईला आणि शेजाऱ्याला रंगेहाथ पकडले. त्या तरुणाने घरात घुसून दोघांचीही गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर तो त्यांचे मृतदेह आपल्या गाडीत घेऊन शुक्रवारी सकाळी ९ वाजता थेट सिरसा येथील सदर पोलिस ठाण्यात गेला. थेट पोलिस स्टेशनला गेल्यावर पोलिसांनी त्याला थांबवले तेव्हा त्याने सांगितले की, त्याच्या आईचे आणि तिच्या प्रियकराचे मृतदेह गाडीत आहेत. “दोन्ही मृतदेह गाडीतून काढा”. पोलिसांनी गाडीची झडती घेतली तेव्हा त्यांना आत दोन मृतदेह आढळले. यानंतर पोलिस ठाण्यात गोंधळ उडाला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि रूग्णालायात पाठवून दिले, तरुणाला ताब्यात घेतले..(Crime News)
पोलिस चौकशीदरम्यान, त्या तरुणाने सांगितले की, “माझ्या आईचे शेजाऱ्याशी अवैध संबंध होते. मला अनेक दिवसांपासून यावर संशय होता. मी माझ्या आईला यापूर्वीही अनेकदा समजावून सांगितले होते, पण ती ऐकत नव्हती.” गुरुवारी रात्री मी त्यांना रंगेहाथ पकडले आणि नंतर दोघांनाही ठार मारले. सिकंदरपूरमधील या दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे आणि विविध चर्चांना उधाण आले आहे. डीएसपी राजेश कुमार म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केली जात आहे आणि दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केले जात आहे..(Crime News)
आणखी वाचा
Comments are closed.