माणगावजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार
मुंबई–गोवा महामार्गावरील मुंगवली पुलाजवळ रेल्वे ब्रिजखाली झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बाळ्या चव्हाण (रा. पेहेल) हे दुचाकीने महाडच्या दिशेने जात होते. त्याचवेळी (एमएच ०६ एच ०५५३) क्रमांकाचा एक ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. दरम्यान दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने वाहन चालवत असल्याने त्यांची दुचाकी थेट ट्रकखाली घुसली. या भीषण धडकेत बाळ्या चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. चुकीच्या दिशेने वाहन चालवण्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Comments are closed.