महिलांचा लैंगिक छळ, धर्मांतर प्रकरण ; ‘त्या’ कंपनीचे नाशिक युनिट बंद करण्याच्या हालचाली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महिलांचे शोषण आणि धर्मांतरप्रकरणी ‘त्या’ आयटी कंपनी व्यवस्थापनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. युनिट बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्याने शेकडो जणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

नाशिकच्या आयटी कंपनीत एका महिलेचा लैंगिक छळ केला, तिचे धर्मांतर केले, आठ महिलांचा विनयभंग केला, एका तरुणाचे धर्मांतर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पंपनीची महिला अधिकारी व सहा पुरुष अधिकारी, कर्मचाऱयांना अटक करण्यात आली. भाजपने या पंपनीवर मोर्चा काढून व्यवस्थापनावर कठोर कारवाईची मागणी केली. आता व्यवस्थापनाने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. काही जणांनी तर नोकरीच सोडली आहे. पोलीस कारवाई झालेल्यांना नोकरीतून निलंबित करण्यात आले आहे. अनेक कर्मचारी, अधिकाऱ्यांना मुंबई, पुण्यासह अन्य ठिकाणी काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काहींना नोकरी सोडण्यास सांगितले आहे. एकूणच कंपनीने नाशिक युनिट बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काही ठरावीक जणांच्या गैरवर्तनामुळे शेकडो कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. नाशिकची आर्थिक उलाढालही कमी होणार आहे. या प्रकरणाचे भाजपकडून राजकारणच जास्त केले जात आहे. यामुळे अन्य आयटी कंपन्याही आपला गाशा गुंडाळण्याची शक्यता आहे. नव्याने कंपन्या येण्याची शक्यता मावळली आहे.

Comments are closed.