खेळ महोत्सवात विजेत्यांचे कौतुक, उपविजेत्यांना प्रोत्साहन
दक्षिण-मध्य मुंबईमधील सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवांतर्गत आयोजित केलेल्या योगासने, कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धांतील विजेत्यांचे कौतुक आणि उपविजेत्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य आयोजक आणि खासदार अनिल देसाई यांनी केले. या स्पर्धांमध्ये विविध वयोगटातील खेळाडूंनी मोठय़ा उत्साहाने सहभाग घेतला आणि आपले कौशल्य सिद्ध केले.
दक्षिण–मध्य मुंबईतील क्रीडागुणांना वाव मिळावा तसेच क्रीडारत्नांचा शोध घेण्यासाठी खेळ महोत्सवात अनेक खेळात झालेल्या स्पर्धांमध्ये हजारोंच्या संख्येने खेळाडूंचा सहभाग लाभला. प्रत्येक खेळाच्या प्रत्येक गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. खेळात हार आणि जीत असतेच. त्यामुळे खासदार देसाई यांनी विजेत्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले, पण उपविजेत्यांना अर्थातच पराभूतांना प्रोत्साहन देत पुढच्या स्पर्धेत विजयासाठीच मैदानात उतरा आणि बाजी मारा, अशा शुभेच्छा दिल्या.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल विजेते आणि उपविजेत्यांना त्यांना आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या महोत्सवामुळे खेळाडूंना त्यांची कला आणि क्रीडा कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळाले, अशी भावना आयोजक व खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केली.
योगा स्पर्धेतील विजेते ः 8 वर्षांखालील मुलीः वृंदा सानप, संचिता पाटील, राजावी बामणे.; 10 वर्षांखालील मुली ः सानवी दळवी, किर्ती पुत्तुस्वामी, तिर्था पाटील.; 12 वर्षांखालील मुली ः स्पृहा सोष्टे, ईशा शिंदे, काव्या राऊत; 16 वर्षांखालील मुली ः आर्या सपाटे, श्रेया सपाटे, दिशा कोने; खुल्या गटातील मुली ः योगांका राजुम, वैदेही मायेका, कृष्णा आचरेकर; 8 वर्षांखालील मुले ः लौकिक गांवकर, पवन सुर्वे, रुद्रसाई चेट्टी; 10 वर्षांखालील मुले ः दिव्याभक्ती शिगवण संघबोधी शिगवण संग्राम पाटील; 12 वर्षांखालील मुले ः नील वावरे, सिद्धेश तिवारी, करण सारक; 16 वर्षांखालील मुले ः स्वराज फिस्के, पार्थ परब, हर्ष गोरीवले; खुला गटातील विजेते ः कृष्णा गुप्ता, निशांत लोखंडे, समीर शेख
बुद्धिबळ स्पर्धेचे विजेते ः 7 वर्षाखालील मुले ःगोरख माधव, शिवांशु शर्मा, मेदांशन बांगर.; 9 वर्षाखालील मुलेः वेदांत चिदंबरम, विहान शेट्टी, विस्मीत सावंत, इशी सिंग, जीया बेदी.; 13 वर्षाखालील मुलेः यश टंडन, आद्विक अग्रवाल, प्रिजेश वी.; 15वर्षाखालील मुलेः व्योम शिवनाथ, राज गायकवाड, महाराजा पिल्लई, सान्वी वर्मा.
Comments are closed.