Operation Sindoor वरुन पाकिस्तानच्या संसदेत खासदाराने काढली पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची लाज

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या भाषणात हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले नाही. असा घरचा आहेर खासदार शाहिद अहमद यांनी पंतप्रधानांना दिला. सध्याच्या घडीला हिंदुस्थानकडून हिंदुस्थान करत असलेल्या, ऑपरेशन सिंदूरचा धसक्याने पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. झालेल्या हल्ल्याचे पडसाद आता पाकिस्तानच्या संसदेमध्येही उमटायला सुरुवात झाली आहे. नुकताच पाकिस्तानचे खासदार ताहीर इक्बाल ”अल्लाह हमारी हिफाजत करे” म्हणत रडू लागले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. सध्या पाकिस्तानी खासदार आपल्याच पंतप्रधानांची लाज काढत असल्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
पाकिस्तानच्या संसदेमध्ये खासदार शाहिद अहमद यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची अक्षरशः सर्वांसमोर लाज काढली आहे. टिपू सुलतान यांच्या वाक्याची आठवण करुन देत, अहमद यांनी एका लष्करात सिंह असले आणि त्याच्यासोबत कोल्हे असतील तरी ते सिंहासारखे लढतात. परंतु सिंहाचा सरदार कोल्हा असेल तर ते सिंहासारखे लढू शकत नाही. ते युद्धात पराभूत होतात. तुमचे नेतृत्व घाबरणारा असेल तर काहीच करु शकत नाही, असे म्हटले आहे.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे शाहिद अहमद हे सदस्य आहेत. शाहिद अहमद याच्यापूर्वी पाकिस्तानी खासदार ताहीर इक्बाल यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पाकिस्तानच्या संसदेत त्यांचेच खासदार आता पंतप्रधानांना घरचा आहेर देताना दिसत आहेत. सध्याची एकूण परिस्थिती पाहता, हिंदुस्थानने पाकिस्तानला इतके जोरदार फटकारले आहे की, पाकिस्तानी खासदारही पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या विरोधात गेले आहेत. एका पीटीआयच्या खासदाराने अतिशय खालच्या पातळीवर येऊन पंतप्रधानांना श्वान दंश झालाय असे ही म्हटले आहे.
Comments are closed.