दिल्लीच्या निवडणुकीत आपचा पराभव का झाला? भाजपमध्ये प्रवेश करताच चढ्ढांनी सांगितलं कारण…
राघव चढ्ढा 'आप'वर: आम आदमी पार्टी (आप) सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये (भाजप) सामील झालेल्या राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आज ‘आप’वर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील ‘आप’च्या पराभवाबाबत एक महत्त्वपूर्ण खुलासाही केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील ‘आप’च्या पराभवामागील सर्वात मोठ्या कारणांपैकी एक म्हणजे अरविंद केजरीवाल यांचा बहुचर्चित आलिशान बंगला होता असं चढ्ढा यांनी म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आलिशान बंगल्याचा भाग-2 चे फोटो आज समोर आले आहेत. माझा विश्वास आहे की जेव्हा अरविंद केजरीवाल यांनी आपला पहिला आलिशान बंगला बांधला, तेव्हा आम आदमी पार्टीची प्रतिमा डागाळली. केजरीवाल यांचा आलिशान बंगला हे दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवामागील सर्वात मोठ्या कारणांपैकी एक होते असे चढ्ढा म्हणाले.
राज्यसभा खासदार राघव चढ्ढा म्हणाले की, दिल्ली निवडणुकीला एक वर्षही उलटले नाही आणि अरविंद केजरीवाल यांचा आलिशान ‘बंगाल पार्ट 2’ समोर आला आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये हा बंगला अत्यंत आलिशान दिसत असल्याचे चढ्ढा म्हणाले.
आम आदमी पक्षाने गांभीर्याने विचार करण्याची गरज : राघव चढ्ढा
माझ्या मते आम आदमी पक्षाने (आप) या सर्व मुद्द्यांवर गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. मला आश्चर्य वाटते की आम आदमी पक्षाचे उरलेले चांगले कार्यकर्ते यावर कशी प्रतिक्रिया देतील. जेव्हा दिल्लीच्या रस्त्यांवर आणि वस्त्यांमध्ये लोक आम आदमी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अरविंद केजरीवाल यांच्या पहिल्या आलिशान बंगल्याबद्दल आणि आता या दुसऱ्या आलिशान बंगल्याबद्दलविचारतील, तेव्हा ते या सर्वांची उत्तरे कशी देऊ शकतील? आम आदमी पक्षाने या प्रकरणावर अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे चढ्ढा म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.