नवी मुंबई विमानतळ नामांतरावरून बाळ्यामामा म्हात्रे कपिल पाटलांना भिडले, दिबांचे नाव देण्यावरून भाजपची चालढकल

आलेल्या कृती समितीच्या बैठकीत भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे आणि माजी मंत्री कपिल पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी आंदोलन छेडावेच लागले, गाठीभेटी थांबवून आता आंदोलनाची तयारी करा, अशी भूमिका बाळ्यामामा यांनी घेतली, तर त्यांच्या या भूमिकेला कपिल पाटील यांनी विरोध करीत मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा आग्रह धरला. काम पूर्ण झाल्यानंतर विमानतळाचे नामांतरण होणार आहे, असे पाटील यांनी जाहीर केल्यानंतर बाळ्यामामा आणि त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. या महिनाअखेरपर्यंत उद्घाटन होणार असे सिडको आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार जाहीर केले आहे. मात्र विमानतळाच्या नामांतरणाबाबत कोणताही निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतला नाही. त्यामळे स्थानिक भूमिपत्रांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण कृती समितीची बैठक वाशी येथील नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबमध्ये पार पडली. या बैठकीला कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, खासदार बाळ्यामामा म्हात्रे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, संजीव नाईक, कपिल पाटील आदी उपस्थित होते.
विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ असा प्रस्ताव कपिल पाटील यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला.
ही चर्चा सुरू असतानाच दोन्ही नेत्यांमध्ये मोठी खडाजंगी झाली. बाळ्यामामा यांनी कपिल पाटील यांना जोरदार धारेवर धरले.
मुख्यमंत्री आणि कृती समिती यांची भेट घडवून आणण्याची जबाबदारी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ही भेट उद्या किंवा बुधवारी होण्याची शक्यता पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दिबांच्या नावासाठी मी 2015 मध्ये लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हापासून मी नियमित पाठपुरावा करीत आहे, असे कपिल पाटील यांनी जाहीर केल्यानंतर बाळ्यामामा म्हात्रे जोरदार भडकले. या गोष्टीला ११ वर्षे झाली आहेत. ११ वर्षे तुम्ही काय करीत होता? असा प्रतिप्रश्न करून त्यांनी प्राटील यांची बोलती बंद केली
Comments are closed.