MPL 2025: ऋतुराजच्या नेतृत्वात ट्राॅफी उंचावण्यासाठी पुणेरी संघ सज्ज! पाहा संपूर्ण स्क्वॅाड

महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL) 2025 चा बिगुल अखेर वाजला असून, स्पर्धेला 4 जूनपासून पुण्यातील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. राज्यातील सर्व सहा संघ आपापल्या तयारीला अंतिम स्वरूप देत आहेत. यंदाचा हंगाम अधिक स्पर्धात्मक आणि रंगतदार ठरण्याची शक्यता असून, सर्व संघांनी आपले ताफे अधिक बळकट केले आहेत. ज्यामध्ये पुणेरी बाप्पा संघाचाही समावेश आहे. पुणे संघ बलाढ्य स्क्वॉडसह मैदानात उतरणार आहे. अनुभवी आणि नवोदित खेळाडूंचा समावेश असलेला हा संघ विजेतेपदासाठी सज्ज झाला आहे. (MPL 2025 Begins from 4 June)

ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असून, त्याच्या नेतृत्वात पुणेरी बाप्पा संघाकडून यंदा जबरदस्त कामगिरीची अपेक्षा आहे. विस्फोटक फलंदाज, अष्टपैलू खेळाडू आणि फिरकीपटूंनी सजलेला हा संघ साखळी फेरीत सर्व संघांसमोर मोठं आव्हान उभं करणार आहे. हे मात्र नक्कीच!

एमपीएन जाधव, आर्य देसाई, ओम पवार, नायशाद शेख, निखिल लुनावत, अब्दुस सलाम, अब्दुस सलाम, अबुनाव तियावरी, मयांका कश्यप, मायाहार पवार. (एमपीएलएल 2025: 4 एस पुंनर ​​बप्पा पूर्ण पथक)

विनामूल्य प्रवेश
या स्पर्धेतील सर्व सामने पुण्यातील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम, गहुंजे येथे खेळवले जाणार आहेत. यासंदर्भात एमसीए अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियममध्ये येणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय त्यांनी लोकांना मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये उपस्थितीत राहण्यासाठी आव्हानं केलं आहे. (Free Entry For All MPL/WMPL Matches)

घरबसल्या थेट सामना – तुमच्या स्क्रीनवर!
ज्यांना स्टेडियममध्ये जाता येणार नाही, त्यांच्यासाठीही खुशखबर आहे की, MPL 2025 मधील सर्व सामने ‘JioHotstar’ या OTT अ‍ॅपवर तसेच ‘Star Sports 2’ वाहिनीवर थेट प्रक्षेपित केले जाणार आहेत. त्यामुळे घरबसल्या मोबाईलवर, टीव्हीवर किंवा लॅपटॉपवर क्रिकेटचा रोमांच पाहता येणार आहे. . (Where to Watch MPL 2025: Live on Star Sports 2 and JioHotstar)

Comments are closed.