MPL 2025: हंगरगेकरच्या नेतृत्वाखाली सातारकर मैदान गाजवण्यास सज्ज! पाहा वेळापत्रक

महाराष्ट्र प्रीमियर लीगचा अर्थात (MPL) एमपीएलचा तिसरा हंगाम येत्या 4 जूनपासून सुरू होत आहे. देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीगपैकी एक महाराष्ट्र प्रीमियर लीगचे हे तिसरे वर्ष आहे. यंदाच्या या हंगामात रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, पुणेरी बाप्पा, सातारा वॅारियर्स, रायगड रॅायल्स आणि कोल्हापूर टस्कर्स हे 6 संघ जेतेपदासाठी भिडताना दिसतील. (MPL 2025: Maharashtra Premier League to Begin from 4th June)

या स्पर्धेतील शुभांरभ सामन्यातच गतविजेता संघ रत्नागिरी जेट्स आणि ईगल नाशिक टायटन्स (4 जून) रोजी आमने-सामने असतील. परंतु असे असले तरीही सातारा वॅारियर्स संघावर सर्वांच्या नजरा असतील. राजवर्धन हंगरगेकरच्या नेतृत्वाखाली संघातील खेळाडू यंदा जेतेपद जिंकण्यासाठी मैदानावर जिवाचं रान करताना दिसतील. स्पर्धेपूर्वी सातारचे सर्व खेळाडू मैदानावर घाम गाळताना दिसत आहेत. सातारा वॅारियर्स संघाचा पहिला सामना 5 जून रोजी रायगड रॅायल्सशी रंगणार आहे.

MPL 2025 साठी सातारा वॅारियर्स संघाचे वेळापत्रक (MPL 2025: Full Schedule of Satara Warriors team)

विरुद्ध रायगड रॅायल्स, 05 जून, दुपारी 2 वाजता
विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, 07 जून, सकाळी 9.30 वाजता
विरुद्ध रत्नागिरी जेट्स, 08 जून, संध्याकाळी 7 वाजता
विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स, 10 जून, दुपारी 2 वाजता
विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, 13 जून, दुपारी 2 वाजता
विरुद्ध रत्नागिरी जेट्स, 15 जून, दुपारी 2 वाजता
विरुद्ध पुणेरी बाप्पा, 16 जून, संध्याकाळी 7 वाजता
विरुद्ध रायगड रॅायल्स, 17 जून, संध्याकाळी 7 वाजता
विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स, 18 जून, संध्याकाळी 7 वाजता
विरुद्ध पुणेरी बाप्पा, 19 जून, दुपारी 2 वाजता

स्पर्धेतील सर्व सामने पुण्यातील गहुंजे येथील एमसीएच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. विशेष म्हणजे या सामन्यांसाठी प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी ही एक मोठी संधी आहे. (Maharashtra Premier League 2025: Free Stadium Entry)

एमसीए अध्यक्ष आ. रोहित पवार यांनी या स्पर्धेबाबत उत्साह व्यक्त करताना सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने मैदानात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, मैदानात जाता न येणाऱ्या प्रेक्षकांसाठी थेट प्रक्षेपणाचीही सोय करण्यात आली आहे. Star Sports 2 या टीव्ही वाहिनीवर आणि JioHotstar या OTT प्लॅटफॉर्मवर हे सामने थेट प्रसारित केले जाणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्याही या रोमांचक स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे.

Comments are closed.