MPL 2025: कधी आणि कुठे पाहता येणार सर्व सामने? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र प्रीमियर लीगचा (MPL 2025) तिसरा हंगाम (4 जून) पासून सुरू होत आहे. या नव्या हंगामाची अनेक जण आतुरतेने वाट पाहत होते. पण आता आतुरता संपली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (MCA) रविवारी (18 मे) रोजी महाराष्ट्र प्रीमियर लीग च्या (MPL) तिसऱ्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. दरम्यान पहिल्या सामन्यातच रत्नागिरी जेट्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स संघ आमने-सामने असणार आहेत. या लीगमध्ये एकूण 34 सामने खेळले जातील, त्यापैकी 4 सामने प्लेऑफचे असतील. लीगचा फायनल सामना (22 जून) रोजी खेळला जाईल.

चाहत्यांच्या मनात असलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजेच, आपण हे सामने कधी व कुठे पाहू शकतो? तर तेच सविस्तर जाणून घेऊयात. आता चाहते प्रत्यक्षात सामने पाहू शकतात. एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये जाऊन आपण हे सर्व सामने प्रत्यक्षात पाहू शकतो. त्याच बरोबर महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाचे सामने जियो हॉटस्टार ओटीटी प्लॅटफॉर्मवर तर स्टार स्पोर्ट्स चॅनलवर देखील पाहता येतील.

Comments are closed.