‘सैयारा’ पाहून थिएटरमध्ये रडणारे इन्फ्लुएन्सर होते

‘बिग बॉस 19’ चा स्पर्धक मृदुल तिवारी याने मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ या चित्रपटाच्या पीआर स्टंटचा पर्दाफाश केला आहे. चित्रपट पाहून थिएटरमध्ये ढसाढसा रडणारे इन्फ्लुएंजर्स होते, त्यांना तसे करण्यास सांगितले होते, असा दावा मृदुलने केला आहे.  अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सैयारा’ने  बॉक्स ऑफिसवर तीनशे कोटींहून अधिकची कमाई केली. या चित्रपटाचे अनेक व्हिडीओ समोर आले होते, ज्यात चित्रपटातील भावनिक दृश्य पाहून तरुणाई थिएटरमध्ये रडताना दिसत होती.

Comments are closed.