कॅप्टन कूलची ‘ती’ चूक महागात पडली; पोलिसांची थेट कारवाई, MS धोनीने नेमका किती दंड भरला?
एमएस धोनीला दंड मराठी बातम्या : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण ठरलंय त्याच्या गाडीचं ओव्हरस्पीडिंग… वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्या कारवर 1000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोनीच्या आलिशान कारचा 1 मार्च रोजी चालान कापण्यात आला. रांचीतील कांके रिंग रोडवर, बिरसा अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी परिसरात ही घटना घडली. त्या भागात वेगमर्यादा ताशी 60 किमी इतकी निश्चित आहे. मात्र, धोनीची कार निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावत असल्याचं आढळलं. ऑटोमॅटिक ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम (ATMS) अंतर्गत बसवलेल्या कॅमेऱ्यांनी हा प्रकार रिअल-टाइममध्ये टिपला आणि तत्काळ 1000 रुपयांचा ई-चलान जनरेट करण्यात आला.
काय म्हणते ट्रॅफिक पोलिस?
रांची ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शहरातील प्रमुख चौक आणि रिंग रोडवर 24×7 एटीएमएस प्रणाली कार्यरत आहे. ओव्हरस्पीडिंग, सिग्नल तोडणे किंवा इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास कोणाचाही चालान कापला जाऊ शकतो, मग तो सामान्य नागरिक किंवा क्रिकेटचा सुपरस्टार असो.
धोनी आणि रांची
धोनी हा रांचीचा स्थानिक रहिवासी असून तो अनेकदा आपल्या फार्महाऊसवर किंवा शहरात दिसून येतो. लक्झरी गाड्यांचा त्याला प्रचंड शौक आहे, हे सर्वश्रुत आहे. मात्र यावेळी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यालाही कायद्याच्या चौकटीत राहून दंड भरावा लागणार आहे.
IPL 2026 साठी सज्ज
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ यांनी मागील महिन्यातच धोनी आयपीएल 2026 हंगामात खेळणार असल्याची पुष्टी केली आहे. मात्र ते संपूर्ण हंगाम खेळणार की निवडक सामने, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.