‘एमएस धोनी मला आवडत नाही’, माजी खेळाडूचं वक्तव्य! चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय
भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने (Manoj Tiwari) मोठा खुलासा केला आहे. त्याने भारतासाठी एकूण 15 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याच्या करिअरमध्ये तो मोठं यश मिळवू शकला असता, पण बहुतेक वेळा लोक त्याला “बदकिस्मत” म्हणायचे. मात्र तिवारी या गोष्टीशी सहमत नाही. त्याने मोठा दावा केला की एम.एस. धोनीला (MS Dhoni) तो आवडत नव्हता आणि याच कारणामुळे त्याला चांगल्या कामगिरीनंतरही योग्य संधी व सपोर्ट मिळाला नाही.
क्रिकट्रॅकरला दिलेल्या मुलाखतीत तिवारीला विचारण्यात आलं की, धोनी खेळाडूंना पूर्णपणे सपोर्ट देतो असं नेहमी म्हटलं जातं, मग त्याला देखील धोनीने तसाच सपोर्ट दिला का? यावर तिवारीने भारताच्या माजी कर्णधारावर थेट टोले लगावले.
धोनीच्या सपोर्टबद्दल बोलताना तिवारी म्हणाला, धोनी खेळाडूंना सपोर्ट करत होता का नाही, यावर वेगवेगळ्या खेळाडूंच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतील. पण माझा अनुभव सांगायचा झाला तर, जर धोनी खरोखरच सपोर्ट करणारा असता तर मला नक्कीच जास्त संधी दिल्या असत्या. कारण मी सातत्याने चांगली कामगिरी करत होतो. मी परत संघात आलो आणि श्रीलंकेविरुद्ध 4 विकेट घेतल्या तसेच 21 धावाही केल्या. पुढच्या सामन्यात मी 65 धावा काढल्या. पण त्या नंतर अचानक काय झालं माहीत नाही, माझ्या संधी बंद झाल्या.
तिवारी पुढे म्हणाला, माझ्यासाठी हे समजणं खूप कठीण होतं की धोनीने मला का सपोर्ट केला नाही, कारण माझ्या मते संघात जागा पक्की करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सातत्याने चांगली कामगिरी करणे.
तिवारीने आणखी सांगितलं, मी इतरांविषयी काही सांगू शकत नाही, पण धोनीने वेळोवेळी हे सिद्ध केलं की तो एक महान कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वगुणांबद्दल काही शंका नाही. पण मला सपोर्ट का मिळाला नाही, याचं उत्तर फक्त धोनीच देऊ शकतो. मला मात्र असं वाटतं की काही विशिष्ट खेळाडूंना धोनी खूप पसंत करत होता आणि त्यांनाच पूर्ण सपोर्ट मिळत होता.
तिवारी शेवटी म्हणाला, क्रिकेटमध्ये ‘पसंत-नापसंत’ अशी गोष्ट खूप चालते आणि मी स्वतःला त्या नावांमध्ये मोजतो, ज्यांना नापसंत केलं गेलं.
Comments are closed.