HAPPY BIRTHDAY MAHI: कॅप्टन कूलचा दरारा अजूनही कायम! हे 5 विक्रम पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
टीम इंडियाचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी आज आपला 44वा वाढदिवस साजरा करत आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. 2007 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर 2011 मध्ये टीम इंडियाने एकदिवसीय विश्वचषक जिंकला, तर 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले. दरम्यान, आम्ही तुम्हाला धोनीच्या त्या पाच विक्रमांबद्दल सांगणार आहोत जे मोडणे कोणत्याही खेळाडूसाठी सोपे असणार नाही.
एमएस धोनीची गणना भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. धोनी हा तिन्ही आयसीसी ट्रॉफी (टी-20विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. कोणत्याही खेळाडूसाठी त्याचा विक्रम मोडणे सोपे होणार नाही.
संपूर्ण जग एमएस धोनीच्या विकेटकीपिंग कौशल्याचे चाहते आहे. तो विजेच्या वेगाने स्टंपिंग करण्यासाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टंपिंगचा विक्रम माहीच्या नावावर आहे. माहीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 192 वेळा खेळाडूंना स्टंप आउट केले आहे. धोनीने कसोटीत 38 वेळा, एकदिवसीय सामन्यात 120 वेळा आणि टी-20 मध्ये 34 वेळा खेळाडूंना स्टंप आउट केले आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या नावावर भारतासाठी सर्वाधिक सामने कर्णधारपद भूषवण्याचा विक्रम आहे. त्याने 60 कसोटी, 200 एकदिवसीय आणि 72 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. त्याने कसोटीत कर्णधार म्हणून 27 सामने, एकदिवसीय सामन्यात 110 आणि 41टी-20 मध्ये 141 सामने जिंकले आहेत. यासोबतच, तो आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो. त्याने त्याच्या नेतृत्वाखाली पाच वेळा सीएसकेला विजेतेपद मिळवून दिले आहे.
यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे. त्याने 31 ऑक्टोबर 2005 रोजी जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद 183 धावांची शानदार खेळी खेळली. यादरम्यान त्याने 15 चौकार आणि 10 षटकार मारले. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा दिग्गज यष्टीरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता. त्याने 2004 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 172 धावा केल्या होत्या.
धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे ज्याने एकदिवसीय सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक केले आहे. त्याने डिसेंबर 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध हे शतक केले होते. पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात त्याने 113 धावा केल्या होत्या.
Comments are closed.