IND vs AUS: सूर्यकुमार यादवने मोडला धोनीचा विक्रम! थालाचा 13 वर्षांचा रेकॉर्ड उध्वस्त
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना 29 ऑक्टोबर रोजी खेळला जात होता, पण पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. भारताने 9.4 षटकांत 97/1 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 24 चेंडूत 39 धावा करून नाबाद होता, तर शुबमन गिल (Shubman gill) 20 चेंडूत 37 धावा करत खेळत होता. पण पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
मात्र या सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात आपल्या टी-20 करिअरमधला 150वा षटकार ठोकला आणि त्याचबरोबर एमएस धोनीचा (Suryakumar Yadav breaks ms Dhoni’s record) विक्रम मोडला.
टी-20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार यादवने आता एमएस धोनीला मागे टाकले आहे. धोनीने 2017 ते 2019 या काळात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 सामन्यांच्या 15 डावांमध्ये एकूण 313 धावा केल्या होत्या. 13 वर्षांच्या खेळीनंतर धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये 300 धावांचा टप्पा ओलांडला होता.
आता सूर्यकुमार यादवने केवळ 10 टी-20 सामन्यांत 36.55 च्या सरासरीने 329 धावा करत धोनीचा हा विक्रम मोडला आहे. या यादीत सूर्यकुमार यादव आता चौथ्या स्थानावर आला आहे, तर एमएस धोनी पाचव्या स्थानावर घसरला आहे.
धोनीचा विक्रम मोडण्यासोबतच सूर्याने या सामन्यात 150 टी-20 षटकार पूर्ण केले असून, तो रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) हा पराक्रम करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
Comments are closed.