ईशान किशनबाबत सगळीकडे चर्चा, पण यष्टीरक्षक फलंदाज वार्षिक करारातून बाहेर का? जाणून घ्या नेमकं कारण

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2025-26 वर्षासाठी खेळाडूंचे वार्षिक करार जाहीर केले आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली आता केवळ टी-20 फॉरमॅट खेळत असल्याने, त्यांची श्रेणी ‘A+’ वरून थेट ‘B’ श्रेणीमध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदा बीसीसीआयने ‘A+’ श्रेणी (7 कोटी रुपये) पूर्णपणे रद्द केली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत जबरदस्त कामगिरी करूनही ईशान किशनला या यादीत स्थान मिळालेले नाही. आकाश चोप्रासह अनेक माजी क्रिकेटपटूंनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, यामागे एक ठोस तांत्रिक कारण आहे.

BCCI चे वार्षिक करार हे मागील हंगामातील (2024- 25) कामगिरीवर आधारित असतात. ईशान किशनने (Ishaan kishan) तब्बल दोन वर्षांनंतर संघात पुनरागमन केले आहे, परंतु 2024-25 या संपूर्ण हंगामात तो भारतासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. वार्षिक कराराच्या ‘C’ ग्रेडमध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळाडूने मागील हंगामात देशासाठी किमान 3 कसोटी सामने, किंवा 8 वनडे सामने, किंवा 10 टी-20 सामने खेळलेले असणे अनिवार्य आहे. ईशानने यापैकी एकही निकष पूर्ण केला नसल्याने त्याला यावर्षी करार मिळू शकला नाही.

ईशान किशनच्या चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही. आता त्याने संघात पुनरागमन केले असून तो सातत्याने खेळत आहे. त्यामुळे जेव्हा बोर्ड 2026-27 सालासाठी करारांची घोषणा करेल, तेव्हा त्यात ईशानचे नाव नक्कीच असेल.

Comments are closed.