…अन्यथा पैसे बंद होणार! ऐन सणासुदीत लाडक्या बहि‍णींच्या डोक्याला ताप, महायुती सरकारनं दिलं नवं टास्क

विधानसभा निवडणुकीपूर्वी मतांच्या बेगमीसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. मात्र याच लाडक्या बहिणी आता सरकारला नावडत्या झाल्या आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व बहिणींना तर सरसकट पैसे देण्यात आले. पण आता सरकारची तिजोरी रिकामी झाल्यामुळे या योजनेसाठी अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. तसेच या योजनेमध्ये काही पुरुषांनीही घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने लाडक्या बहि‍णींना नवीन टास्क दिले असून ई-केवायसी करण्यास सांगितले आहे.

महिला व बालविकास विभागाने या संदर्भात आदेश जारी केला आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 2 महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिला.

Comments are closed.