म्युल बँक खात्यांतून करोडोंचा गंडा, सहाजणांवर झडप; ७२ एटीएम कार्ड, तीन लॅपटॉप जप्त
सायबर फसवणुकीसाठी गरजू नागरिकांच्या नावाने म्युल बँक खाती उघडून त्यांचा गैरवापर करणाऱ्या संघटित सायबर टोळीचा पर्दाफाश करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींसह एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून ७२ एटीएम कार्ड, १८ सिमकार्ड, तीन लॅपटॉप, पाच प्रीपेड कार्ड, सहा मेमरी कार्ड, एक पेनड्राइव्ह, सात गेमिंग कार्ड, क्रिप्टोकरन्सी वॉलेट ऑपरेट करण्याचे डोंगल, ५७ हजार रुपये रोख तसेच एक कार, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बँक खात्यांची एनसीसीआरपी आला आहे. पोर्टलवर तपासणी केली असता संबंधित प्रत्येक खात्यावर मोठ्या प्रमाणात सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद असल्याचे आढळून आले. खातेदारांनी आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात आपली बँक खाती इतर व्यक्तींना वापरण्यास दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी २० जुलै २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाच्या सुरुवातीला मयूर म्हात्रे याला पेणमधून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पवन कुमार चिलीमुंटा याची आंध्र प्रदेशातून उचलबांगडी करण्यात आली. हे दोघे विविध खातेदारांच्या नावाने म्युल बँक खाती उघडणे तसेच बनावटपद्धतीने मिळवलेल्या सिमकार्डची व्यवस्था करण्याचे काम करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
Comments are closed.