66 रुपयांचा शेअर पाच वर्षात पोहोचला 2301 रुपयांवर,’या’ मल्टी बॅगर शेअरनं 1 लाखांचे केले 35 लाख
नवी दिल्ली : शेअर बाजारात गुंतवणूक करणारा प्रत्येक गुंतवणूकदार नेहमी मल्टीबॅगर शेअरच्या शोधात असतो. मल्टीबॅगर शेअर म्हणजे ज्यातून पैसे वेगात वाढतात. V2 रिटेल लिमिटेड हा एक मल्टीबॅगर स्टॉक आहे. गेल्या पाच वर्षात या स्टॉकनं गुंतवणूकदारांचे पैसे 35 पट वाढवले आहेत. वी टू रिटेलचा सेअर आज 2301 रुपयांवर ट्रेड करत आहेत. 2020 मध्ये या कंपनीचा शेअर 66.45 रुपयांवर होता.या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2564.10 रुपये तर 52 आठवड्याचा नीचांक 1211 रुपये इतका आहे.
V2 रिटेल : V 2 रिटेल गुंतवणूकदार
वी 2 रिटेल लिमिटेडनं आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत 709 कोटींचं उत्पन्न मिळवलं आहे. जे गेल्यावर्षीच्या तुलनेत 86 टक्के अधिक आहे. कंपनीचा नफा 17 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनी 2 कोटी रुपये तोट्यात होती.मात्र, गेल्या पाच वर्षात कंपनीचा निव्वळ नफा 88 टक्के सीएजीआरनं वाढला आहे.
वी 2 रिटेल लिमिटेड शेअर गेल्या एका महिन्यात अडीच टक्क्यांनी वाढला आहे. सहा महिन्यांचा हिशोब केला तर तो 15 टक्क्यांनी वाढला आहे. 2025 मध्ये हा शेअर 36 टक्क्यांनी वाढला आहे. एका वर्षभरात या शेअरनं गुंतवणूकदारांना 82 टक्के रिटर्न दिले आहेत. या मल्टीबॅगर शेअरनं 5 वर्षात 2615 टक्के रिटर्न दिले आहेत.
वी 2 रिटेल लिमिटेड या स्टॉकमध्ये ज्या गुंतवणूकदारानं पाच वर्षापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल त्याचं मूल्य 35 लाख रुपये झाले आहेत. कारण पाच वर्षात हा स्टॉक 66 रुपयांवरुन 2300 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
वी 2 रिटेल लिमिटेडची सुरुवात 2001 मध्ये राम चंद्र अग्रवाल यांनी केली होती. तेव्हापासून कंपनीनं टिअर II आणि टिअर III शहरात रिटेल नेटवर्क वाढवलं होतं. किफायतशीर किमतीवर गुणवत्तापूर्ण उत्पादनांची विक्री हा कंपनीचा फॉर्म्युला त्यांचासाठी यश मिळवून देणारा ठरला. कंपनीकडे आता 23 राज्यात 195 हून अधिक शहरात 259 स्टोअर आहेत.
वी 2 रिटेल आता फक्त रिटेलिंगमध्ये मर्यादित नसून वी 2 स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगद्वारे कापड निर्मिती करतो. कंपनीचा येत्या काळात आणखी विस्तार करण्याचा प्लॅन आहे.
दरम्यान, भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये किरकोळ तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्समध्ये 79.53 अंकांची वाढ पाहायला मिळत असून सेन्सेक्स 85314.21 वर पोहोचला आहे. तर निफ्टी 26085. 20 वर पोहोचला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.