2 रुपयांचा स्टॉक पाच वर्षात पोहोचला 1400 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल, कंपनीनं घेतला मोठा निर्णय
शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार नेहमी चांगला परतावा देणाऱ्या स्टॉकच्या शोधात असतात. मल्टीबॅगर स्टॉकमुळं गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. श्री अधिकारी ब्रदर्स टेलीव्हिजन नेटवर्क लिमिटेडच्या गुंतवणूकदांना चांगला परतावा मिळाला आहे.

पाच वर्षांपूर्वी या कंपनीचा स्टॉक 2 रुपये होता. आज हा स्टॉक 1400 रुपयांवर पोहोचला आहे. पाच वर्षांपूर्वी एखाद्या गुंतवणूकदारानं या कंपनीचे 1 लाख रुपयांचे स्टॉक खरेदी केले असते तर त्याचं मूल्य 9.04 कोटी रुपये झालं असतं. म्हणजेच या स्टॉकनं पाच वर्षात गुंतवणूकदारांना कोट्यधीश केलं आहे.

श्री अधिकारी ब्रदर्स टेलीव्हिजन नेटवर्क लिमिटेड चा स्टॉक 1.19 टक्क्यांच्या तेजीसह 1410 रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर स्टॉकनं 1423 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, बाजार बंद होईपर्यंत हा स्टॉक 1400 रुपयांवर होता.

श्री अधिकारी ब्रदर्स टेलीव्हिजन नेटवर्कच्या स्टॉकमध्ये गेल्या 5 वर्षात 93806 टक्क्यांची तेजी आली आहे. गेल्या एक महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये 76 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. तर, सहा महिन्यात स्टॉकमध्ये 139 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.

श्री अधिकारी ब्रदर्स टेलीव्हिजन नेटवर्क या मल्टीबॅगर स्टॉकच्या बोर्डाची मीटिंग 24 नोव्हेंबरला झाली होती.ज्यात ंपनीनं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीचं नवं नाव Aqylon Nexus Limited असं असेल.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
येथे प्रकाशित : 27 नोव्हेंबर 2025 09:53 PM (IST)
व्यापार-उद्योग फोटो गॅलरी
आणखी पाहा
Comments are closed.