Mumbai News- खेळता खेळता अचानक लिफ्ट उघडली, 10 व्या मजल्यावरून तोल जाऊन 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईच्या नेहरू नगर भागातील ‘शमीम टॉवर’ या इमारतीमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. मित्रांसोबत लपाछपी खेळताना 10 व्या मजल्याच्या लिफ्टमधून पडून एका 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीतील मुले खेळत असताना अनेकदा लिफ्टच्या आसपास लपायची. घटनेच्या वेळी मुलगा लिफ्टच्या दरवाजाला टेकून उभा होता, मात्र अचानक लिफ्टचा दरवाजा उघडला गेल्याने तो थेट 10 व्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यापर्यंत खाली कोसळला, अशी माहिती त्यांनी एएनआयशी बोलताना दिली.

या दुर्घटनेनंतर इमारतीमधील सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. गेल्या सात महिन्यांपासून या इमारतीमधील लिफ्ट नादुरुस्त होती आणि ती कधीच व्यवस्थित काम करत नव्हती, असा आरोप एका व्यक्तीने प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. अपघाताच्या वेळी संबंधित मजल्यावर वीज नसल्यामुळे पूर्णपणे अंधार होता. लिफ्टच्या तांत्रिक बिघाडामुळेच निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Comments are closed.