हिवाळ्याआधीच चिंता वाढली… मुंबई देशातील सर्वात प्रदूषित शहर; जगातही पाचवा क्रमांक, एक्यूआय पोहोचला 173 वर
एकीकडे सूर्य आग ओकत असल्याने मुंबईकरांचा घामटा निघत असताना, आता सरासरी ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ 173 पोहोचल्याने हवा आरोग्याला धोकादायक बनली आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे मुंबई देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले असून, जगातही मुंबईचा प्रदूषणात पाचवा क्रमांक लागला आहे. हिवाळा सुरू होण्याआधीच प्रदूषण वाढल्याने मुंबईकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
‘एल निनो’च्या प्रभावामुळे वाऱ्याचा वेग कमालीचा मंदावला आहे. त्यामुळे हवा खेळती राहत नसल्याने हवेतील घातक कण खालच्या थरात साचून राहत आहेत. यातच मोठय़ा प्रमाणात सुरू असलेली 11 हजार बांधकामे, प्रकल्पांच्या कामांमधून उडणारी धूळ, उष्ण दमट हवा यामुळे प्रदूषणात मोठी भर पडली आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामे, प्रकल्प आणि आस्थापनांना पालिकेने 27 प्रकारची नियमावली जारी केली आहे. यामध्ये बांधकाम क्षेत्र कपडय़ाने बंदिस्त करणे, प्रिंकलर बसवणे, ‘एक्यूआय’ निर्देशांक मशीन बसवणे असे निर्देश देण्यात आले आहेत.
AQI
देवनार 145
bkc 145
भांडुप 151
जुहू 182
गोवंडी 184
कुर्ला 151
बोरिवली 153
Comments are closed.