न्यू इंडिया सहकारी बँक अपहार प्रकरण, फरार आरोपी अरुणचलमचा मुलगा मनोहरला अटक

न्यू इंडिया सहकारी बँकेच्या 122 कोटींच्या अपहार प्रकरणातील पसार आरोपी अरुणचलम उर्फ अरुण भाई याचा मुलगा मनोहर याला आर्थिक गुन्हे शाखेने गुरूवारी बेड्या ठोकल्या. अपहार प्रकरण उघडकीस आल्यानंतर सोलार पॅनलचा व्यवसाय करणारा अरुण त्याचा मुलगा मनोहरसह परागंदा झाला होता. मात्र मनोहर तपास पथकाच्या हाती लागला. त्याला रितसर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे.

मनोहर हाती लागला असला तरी अरुण भाई मात्र अजून पोलिसांना सापडू शकलेला नाही. अरुणला 40 कोटी दिले होते आणि त्याने ते पैसे दोन ट्रस्टला दिले होते, असा हितेश मेहता याचा दावा आहे.

Comments are closed.