Mumbai bmc election 2025 uddhav thackeray party shiv sena corporators unhappy may join bjp vvp96
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर सर्व राजकीय पक्षांनी आपलं लक्ष आगामी महापालिका निवडणुकीकडे वळवलं आहे. तसेच, महापालिका निवडणुकीसाठी माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. पण यंदाची मुंबई महापालिका निवडणूक ही वेगळी ठरणार आहे.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर सर्व राजकीय पक्षांनी आपलं लक्ष आगामी महापालिका निवडणुकीकडे वळवलं आहे. तसेच, महापालिका निवडणुकीसाठी माजी नगरसेवकांसह इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. पण यंदाची मुंबई महापालिका निवडणूक ही वेगळी ठरणार आहे. कारण मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकतो आहे. पण यंदा हीच शिवसेना दोन गटांत निवडणूक लढणार आहे. त्यात शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकारे पक्षासाठी ही निवडणूक कठीण जाणारी आहे. कारण अनेक नगरसेवकांनी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे. (mumbai bmc election 2025 uddhav thackeray party shiv sena corporators unhappy may join bjp)
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला अनेक नगरसेवक उपस्थित होते. पण या बैठकीत नगरसेवकांकडून नाराजीचा सूर उमटल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, “पक्षाकडून आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. लोकसभा निवडणुकीपासून आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. आम्हाला कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जात नाही. मातोश्रीवर होणाऱ्या पदाधिकारी आढावा बैठकीत देखील माजी नगरसेवकांना बोलवलं जात नाही. तसेच विधानसभा निवडणुकीत देखील विधानसभा मतदारसंघात उमेदवार देताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेतले नव्हते”, अशा शब्दांत ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
– Advertisement –
2017 साली झालेली मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना-भाजपने युतीत लढवली होती. त्यावेळी शिवसेनेचे 84 नगरसेवक तर, भाजपचे 82 नगरसेवक निवडणूक आले होते. पण युतीधर्म पाळत भाजपकडून पुन्हा शिवसेनेच्या महापौराला संधी देण्यात आल्याचे बोलले जाते. पण यंदा परिस्थिती बदलली असून, भाजप आणि शिवसने युतीत आहेत पण उद्धव ठाकरे सोबत नाहीत. शिवसेनेत बंड झाल्यापासून लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद या निवडणूक शिवसेनेने दोन गटांत लढवल्या. आता महापालिका निवडणूक ही दोन गटांत लढवली जाणार आहे. अशात ठाकरे मुंबई महापालिकेवरील आपला भगवा झेंडा कायम ठेवण्यात यशस्वी ठरतात का, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, शिवसेनेतील दोन गटांमुळे बदललेली परिस्थिती ठाकरे गटासाठी धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. कारण एकिकडे मातोश्रीवरील बैठकीला न बोलवणं आणि नगरसेवकांना विचारात न घेणं असं अनेकांच म्हणणं आहे तर, दुसरी नाराज नगरसेवर दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याची भीती आहे. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक हे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
– Advertisement –
हेही वाचा – Depreciation of Rupee : अक्षय कुमार, जुही चावला, अनुपम खेर हे मोदींचे अंधभक्त, ठाकरे गटाचा निशाणा
Comments are closed.