Mumbai Crime mumbai cab charges nri rupees 2800 for 10 minutes ride asj


मुंबई : मुंबईत अनेक प्रकारे फसवणुकीची प्रकरणे समोर येतात. पण नुकतेच एक असे प्रकरण समोर आले, ज्यामुळे ऍपवरून कॅब बुक करणे एका ऑस्ट्रेलियाच्या एनआरआयला महागा पडले. मुंबईत ऑस्ट्रेलियातून आलेल्या एका अनिवासी भारतीय व्यावसायिकासोबत एक अजब प्रकार घडला. मुंबई विमानतळावरील एका टॅक्सी चालकाने बनावट ॲपचा वापर करत विलेपार्लेपर्यंतच्या 10 मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल 2800 रुपये आकारले. तो व्यापारी हॉटेलमध्ये पोहोचल्यावर त्याची मोठी फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. ही घटना 15 डिसेंबरला घडली आहे. (Mumbai Crime mumbai cab charges nri rupees 2800 for 10 minutes ride)

हेही वाचा : Kalyan Kidnapped Case : सर्व गुंड कल्याण, अंबरनाथ, बीडमध्येच का असतात? राऊतांचा सरकारला सवाल 

– Advertisement –

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित एनआरआय डी विजय हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. एका वृत्तपत्राला त्याने दिलेल्या माहितीनुसार, मी हॉटेलवर येण्यासाठी कॅब बघत असताना संबधित आरोपी चालक माझ्याकडे आला. मी त्याच्या मागे गेलो. मी प्रीपेड काउंटर पाहिले, पण मी त्याच्याशी आधीच बोललो असल्याने, मी त्याची कॅब भाड्याने घेण्याचे ठरवले. जेव्हा त्याने मला भाड्याबद्दल सांगितले, तेव्हा मी काहीही बोललो नाही. 49 वर्षीय एनआरआय डी विजय 3 वर्षांनी कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आले होते.

समोर आलेल्या माहितीनुसार, एनआरआय विजय यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांक आणि गाडीच्या वर्णनाच्या आधारे कॅब चालकाला अटक करण्यात आली कॅब चालकाचे नाव आहे. कॅब चालकाने एनआरआय विजय यांना सांगितले होते की, जेव्हा तो मुंबईला पोहोचेल तेव्हा त्याला कॉल करा. हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर विजयने मॅनेजरशी प्रवासी भाड्याबद्दल विचारणा केली. तेव्हा इथपर्यंतचे भाडे फक्त 700 रुपये होते असे सहार पोलिसांच्या लक्षात आले. यानंतर विजय नागपूरला गेले आणि मुंबई पोलिसांच्या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवली.

– Advertisement –

विजयने अनुभव सांगितला की, ओला आणि उबेरसारखे दिसणारे बनावट ऍप्स दाखवून फसवणूक करण्याचा हा एक नवीन प्रकार आहे. मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांना प्रवासभाड्याबद्दल माहिती नसते. तक्रार दाखल करण्यापूर्वी मी मुंबईमधील माझ्या मित्राला तो मोबाईल नंबर तपासण्यास सांगितले. त्यानंतर ही बाब पोलिसांना कळवण्यात आली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्या आरोपीला पकडले. यावेळी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी विमानतळाबाहेर स्पष्ट फलक लावण्याची शिफारस व्यावसायिकाने केली. काही दिवसापूर्वी सांगली येथे राहणारा 19 वर्षीय अमेरिकेत राहणारा विद्यार्थी विश्वजित पाटील याच्याकडून 3,500 रुपये लुटल्याप्रकरणी पोलिसांनी ऑटोरिक्षा चालकाला अटक केली होती.


Edited by Abhijeet Jadhav



Source link

Comments are closed.