भाजपच्या माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये छोट्या तलवारी, लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी; ड

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">डोंबिवली: डोंबिवलीमध्ये काल (शनिवारी) रात्रीच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील राजू नगर परिसरात  भाजपच्या माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या आजीमाजी समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. तलवारी, लोखंडी रॉड, दगडांनी दोन्ही गटाकडून मारहाण करण्यात आली आहे. या राड्यात तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी विष्णू नगर पोलीसानी दोन्ही गटांनी दिलेला तक्रारीनुसार दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल करत तीन जणांना अटक केली आहेत. याप्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. भाजप नगरसेवकांच्या आजी-माजी समर्थकांमध्ये झालेल्या या राड्यामुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

काल (शनिवारी) दुपारच्या सुमारास भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे हे कामानिमित्त एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेले होते. यावेळी त्याठिकाणी मेघराज तुपांगे आले. तुपांगे आणि म्हात्रे यांचे सुरक्षारक्षक यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. याप्रकरणी या सुरक्षा रक्षकाने विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मेघराज तुपांगे हे काही वर्षांपूर्वी भाजप नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या समर्थक होते. मात्र काही कारणावरून दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहेत. काल रात्रीच्या सुमारास मेघराज तुपांगे आणि त्याच्या साथीदारांचा विकास म्हात्रे यांचे समर्थक प्रमोद चव्हाण आणि महेश चव्हाण यांच्यात पुन्हा जोरदार राडा झाला.

त्याचबरोबर पुन्हा रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास विकास म्हात्रे यांचे समर्थक प्रमोद चव्हाण, महेश चव्हाण मित्रा बरोबर गप्पा मारत असताना मोटर सायकलवरून आलेल्या मेघराज तुपांगे, उमेश भोईर, शत्रुघ्न भोईर, विशाल म्हात्रे, अशोक म्हात्रे यांच्यासह आणखी काही अनोळखी व्यक्ती हातात छोट्या तलवारी, लोखंडी रॉड घेऊन आले. तिथे येताच गप्पा मारणाऱ्या चव्हाण यांच्यासह इतरांना बेदम मारहाण केल्याची तक्रार अजय गोलतकर यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात केली. तर आपण दुचाकीवरून घरी परतत असताना प्रमोद चव्हाण यांच्यासह चौघांनी अंधारात आपला रस्ता अडवून आपल्यावर धारदार हत्याराने हल्ला करत आपल्यासह इतरांना जखमी केल्याची तक्रार मेघराज तुपांगे यांनी केली आहे.  या दोन्ही तक्रारीवरून पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करत अजय गोलतकर याच्यासह विरोधी गटातील शत्रुघ्न मढवी, विशाल म्हात्रे, अशोक म्हात्रे, या चौघांना अटक केली आहे. तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रमोद चव्हाण आणि महेश चव्हाण याना उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत .

Comments are closed.