धक्कादायक!  सोन्याच्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, विमानतळावरील कर्मचाऱ्यांचा समावेश, 4 जणांना अटक

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">Mumbai Crime News : ऑपरेशन गोल्डन स्वीप अंतर्गत , महसूल गुप्तचर संचालनालय (DRI ) मुंबईकडून विमानतळ कर्मचार्‍यांचा सहभाग असलेल्या सुवर्ण तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. 4 किलो सोन्यासह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सोन्याची तस्करी सुरु होती. अखेर महसूल गुप्तचर संचालनालयाने रॅकेटचा भंडाफोड केला आहे.

परदेशातून तस्करी होत असलेले 4 किलो सोने जप्त

परदेशातून तस्करी होत असलेले 4 किलो सोने जप्त करण्यात आले असून या सोन्याची अंदाजे किंमत 4.64 कोटी रुपये आहे. या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एक विमानतळ कर्मचारी, दोन ‘हँडलर्स’ आणि एक प्रवासी यांचा समावेश आहे. हे रॅकेट मुंबईत मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्याचे तपासात समोर आले आहे. DRI च्या तपासात परदेशी नागरिक शरीरावर हे सोने लपवून भारतात आणत असत. विमानतळावर आल्यावर, ते हे सोने विमानांच्या ओव्हरहेड बॅगेज डब्यांमध्ये लपवत होते. त्यानंतर, एक विमानतळ कर्मचारी हे सोने त्या ठिकाणाहून उचलून  विमानतळाच्या बाहेर नेऊन ते ‘हँडलर्स’च्या हवाली करत असे,. तपास अजूनही सुरू असून, या टोळीतील इतर सदस्यांबाबत आणि आर्थिक व्यवहारांबाबत शोध घेतला जात आहे.

दोन दिवसांपूर्वीच DRI ने 10.5 किलो सोने केले होते जप्त, 13 जणांना अटक

दोन दिवसांपूर्वीच DRI ने 10.5 किलो 24-कॅरेटचे सोने (किंमत 12.58 कोटी) जप्त करत, 13 जणांना अटक केली होती. ज्यात 8 ट्रांझिट प्रवासी, 2 विमानतळ कर्मचारी, 2 ‘हँडलर्स’ आणि टोळीचा मुख्य सूत्रधार यांचा समावेश होता. या ऑपरेशनद्वारे आतापर्यंत 14 किलोहून अधिक तस्करी केलेले सोने (सुमारे 17 कोटी मूल्याचे) जप्त करण्यात आले आहे. तपासात असे दिसून आले की एका आंतरराष्ट्रीय टोळीने अत्याधुनिक कार्यपद्धतीचा अवलंब करत ‘ट्रान्झिट प्रवाशां’चा वापर केला होता. दुबईहून सिंगापूर, बँकॉक आणि ढाका येथे मुंबईमार्गे जाणारे प्रवासी वाहक म्हणून काम करायचे. हे प्रवासी त्यांच्या शरीरात अंड्याच्या आकाराच्या मेणाच्या कॅप्सूलमध्ये सोने लपवून नेत असत. बईत आगमन झाल्यावर, ट्रान्झिट प्रवासी गुप्तपणे तस्करी केलेले सोने आंतरराष्ट्रीय प्रस्थान क्षेत्रातील विमानतळ कर्मचाऱ्यांना सुपूर्द केले.त्यानंतर, कर्मचारी ते सोने बेकायदेशीरपणे विमानतळ परिसरातून बाहेर काढून ते हँडलर्स आणि रिसीव्हरकडे देत असत, जे पुढे मुख्य सूत्रधाराशी संपर्क साधत असत. मुंबई आणि दुबई येथील सूत्रधारांच्या नियंत्रणाखाली चालवल्या जाणाऱ्या या टोळीत ट्रान्झिट प्रवासी, विमानतळ कर्मचारी, हँडलर आणि रिसीव्हरच्या अनेक थरांचा समावेश होता.

महत्वाच्या बातम्या:

<एक href ="https://marathi.tezzbuzz.com/news/india/gujarat-coast-guard-seid--boot-carrying-drugs-1800-कोटी-फिशिंग-लेबल-वापरलेले-स्मगलिंग-रॅकेट-रॅकेट -134263">मोठी बातमी: गुजरातच्या समुद्रात तब्बल 1800 कोटींचा ड्रगसाठा असणारी बोट पकडली, मासेमारीच्या नावाखाली मोठं रॅकेट

& nbsp;

Comments are closed.