सोन्याच्या लालसेपोटी कट, 76 वर्षीय वृद्धाला सलून मालकाने संपवलं अन् मृतदेह ड्रेनेजमध्ये फेकला;

ठाणे गुन्हे: मिरा-भाईंदर (Mira Bhayandar) परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. सोन्याच्या लालसेपोटी एका 76 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठल तांबे (वय 76) हे 16 सप्टेंबर रोजी अचानक बेपत्ता झाले. नेहमीप्रमाणे घराबाहेर गेलेले तांबे काही वेळात परत आले नाहीत आणि त्यांच्याशी संपर्कही साधता न आल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून चिंतेने काशिमिरा पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली.

सीसीटीव्ही तपासणी आणि धक्कादायक खुलासा

17 व 18 सप्टेंबर रोजी पोलिसांनी तांबे कुटुंबियांसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. तपासादरम्यान विठ्ठल तांबे हे शेवटचे एका स्थानिक सलूनमध्ये जाताना दिसून आले. यानंतर पोलिसांनी सदर सलूनचे सीसीटीव्ही फुटेज मिळवून तपासले असता एक धक्कादायक बाब समोर आली.

फुटेजमध्ये सलून मालकानेच विठ्ठल तांबे यांची गळा आवळून हत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरले. इतकेच नव्हे तर, आरोपीने मृतदेह सलूनच्या आतील भागातून ओढत नेतानाचा व्हिडिओही फुटेजमध्ये दिसून आला आहे.

मृतदेहाची विल्हेवाट

तपास अधिक खोलात गेल्यावर उघड झाले की आरोपीने हत्या केल्यानंतर मृतदेह सलूनमधून बाहेर ओढून नेला आणि तो जवळच्या ड्रेनेजमध्ये फेकून दिला होता, जेणेकरून त्याचा कोणताही ठावठिकाणा लागू नये. या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत सलून चालकाला अटक केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचीही चौकशी केली जात आहे.

स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

या घटनेमुळे मिरा-भाईंदर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिकांमध्ये संताप असून, वृद्धांना लक्ष्य करणाऱ्या अशा गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime News: नगरमध्ये 4 सख्ख्या बहि‍णींवर नातलगाने केला लैंगिक अत्याचार, लग्न झालेल्या तरुणीलाही सोडलं नाही, प्रकरण असं आलं उघडकीस, आई- वडील…

Solapur Crime News: मित्राच्या गळ्यात चाकू आरपार भोसकला अन् चिरला, मैत्रिणीच्या छातीत खुपसला 3 वेळा चाकू, मध्यरात्री लातूर-सोलापूर हायवेवर रक्तरंजित थरार

आणखी वाचा

Comments are closed.