Mumbai DCM Eknath Shinde office to Railway department


मुंबई : मुंबईत सध्या पावसाळापूर्व कामांची लगबग सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (23 मे) शहर आणि पूर्व उपनगर भागातील कामांची पाहणी करत झाडाझडती घेतली. त्यावेळी भांडूप रेल्वे स्थानकाजवळील उषा नगर नाल्याच्या ठिकाणी कल्व्हर्टच्या कामात मध्य रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे समजताच, जर पावसाळी कामांत तुम्ही सहकार्य करीत नसाल तर आम्ही थेट केंद्रात रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार करू, अशी तंबी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्याला दिली. (Mumbai DCM मराठी office to Railway department)

हेही वाचा : Rahul Gandhi : ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना…; भाजप नेत्याचा राहुल गांधींवर निशाणा 

गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी समुद्राला मोठी भरती होती. कुर्ला, चुनाभट्टी, भांडूप, विद्याविहार इत्यादी सखल भागात पावसाचे पाणी कमी-अधिक प्रमाणात साचले होते. त्यामुळे रेल्वेसेवा काही तास विस्कळीत झाली होती. पण, यंदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने पावसाच्या तोंडावर कंबर कसली आहे. भांडूप रेल्वे स्थानक उषा नगर नाला येथे कल्व्हर्टची संख्या कमी आहे. तसेच, सदर ठिकाणी मोठी जलवाहिनी वाळविणे बाकी होते. त्याचप्रमाणे सध्या तेथे अस्तित्वात असलेल्या कल्व्हर्टची साफसफाई करणे, कल्व्हर्टची संख्या वाढविणे, अस्तित्वातील नाल्याची रुंदी आणखीन वाढविणे, जलवाहिनी स्थलांतरित करणे इत्यादी कामे प्रस्तावित होती. त्यापैकी जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम करण्यात आले आहे. दोन कल्व्हर्टची सफाई करण्यात आली. पण नवीन कल्व्हर्ट उभारणे, त्याची बांधणी करणे इत्यादी कामे करण्यात येत आहेत. पण त्या कामात मध्य रेल्वेकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही, अशा तक्रारी महापालिकेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.

त्याची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्व उपनगर येथे भांडूप रेल्वे स्थानकाजवळ उषा नगर नाला येथे पाहणी केली असता त्या ठिकाणी उपस्थित मध्य रेल्वेचे अधिकारी यांना जवळ बोलावून चांगलेच फटकारले. तसेच, तुम्ही जर पावसाळी कामात पालिकेला सहकार्य न केल्यास तुमची थेट तक्रार केंद्रात म्हणजे रेल्वे मंत्रालयात अथवा रेल्वे मंत्री यांच्याकडे करण्यात येईल,’ अशी तंबी त्यांनी दिली. त्यावर संबंधित अधिकारी यांची बोबडीच वळली. ते बिथरले आणि त्यांनी आम्ही सहकार्य करू, असे नम्रपणे सांगितले आणि उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीतून आपली कशीतरी सुटका करून घेत तेथून काढता पाय घेतला.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, काही सूचना केल्या आणि भांडूप येथील रेल्वे मार्गाच्या ठिकाणी नाल्याचे आणि पावसाचे पाणी पुन्हा साचणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत लवकरात लवकर उपाययोजन करण्याचे आदेश दिले. यावेळी, एकनाथ शिंदे यांनी, उषा नगर नाल्याची नीटपणे सफाई होत नसल्याने आणि नाल्याचे पाणी तुंबल्याने त्याचा मोठा फटका भांडूप (पश्चिम) येथील उषा नगर नाल्यालगत असलेल्या काही सोसायटींमध्ये जाऊन भेट दिली. तसेच, स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यानंतर उप मुख्यमंत्री शिंदे यांनी, सदर उषा नगर नाल्याच्या पाणी पावसाळ्यात आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये शिरणार नाही, यासाठी आवश्यकत त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले.



Source link

Comments are closed.