महायुती सरकारला अदानींची सेवा करायची होती, म्हणून 3 वर्ष पालिका निवडणूक घेतली नाही; धारावीत आदित्य ठाकरे कडाडले
महायुती सरकारला अदानींची सेवा करायची होती, म्हणून 3 वर्ष पालिका निवडणूक घेतली नाही, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज आदित्य ठाकरे यांनी धारावी कोळीवाड्यातील नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “धारावीचा लढा जवळपास दीड- दोन वर्ष सुरूच आहे. अनेक गोष्टी आपण ऐकत आलो आहे. कोण काय सांगतं, कोणी दुसरं काही सांगतं. मात्र हे सगळं चालू असताना काही बारकावे आहेत, हे तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी मी येथे आलो आहे. कदाचित तुम्हाला वाटत असेल की, डीआरपीमधून आपल्याला वगळलेले आहे तर, आपली राहती वस्ती ती त्यातून बाहेर काढली आहे. यामुळे आपल्याला धोका नाही. पण पुढे जात असताना आणि पुढे काय काय होणार आहे, हे पाहता असताना मला वाटतं, आपल्या पूर्ण कोळीवाड्याने सावधपणे पुढचे पावले टाकणे गरजेचं आहे.”
आदित्य ठाकरे म्हणाले. “मागच्याच महिन्यात मी कुंभारवाड्यात येऊन गेलो. कुंभारवाड्यात मी घरोघरी गेलो. अनेकनाच्या घरी गेल्यानंतर पाहिलं, तिथे छोटे-छोटे व्यवसाय चालू आहेत. ज्या आपण पणत्या लावतो, तसेच दहीहंडीला आता दहा थर लागलेला लागले आहेत. मात्र त्या दहाव्या थरावर हंडी जी आपण हंडी फोटडो ती कुंभारवाड्यातून येते. आता गणपतीचं सण येईल, पणती आपल्या घरोघरी लागणार. नवरात्री, दिवाळीचा सण आहे. यातच आपल्याला जे काही साहित्य लागतं, जे कुंभारांकडून यायचं असतं, ते कुंभारवाड्यातून येतं. आमच्या शेजारच्या एरियाचा अभिमान वाटतो. कलानगर आणि धारावीमध्ये काहीच अनंत नव्हतं. मात्र बीकेसी मधल्यामध्ये नंतर आलं. मात्र तेही आपलंच आहे. तसं पाहायला गेलं तर, मुंबईच सगळी आपलीच आहे. हे जरी असलं तरी, कुंभारवाड्यात गेल्यानंतर अनेक लोक मला प्रश्न विचारात होते की, आमचं काय होणार? आम्ही जायचं कुठे? आम्ही येथून निघाल्यानंतर आमच्या व्यवसायाचं काय होणार? आम्हाला इमारतींमध्ये टाकल्यानंतर जे आमचे पिढ्यांपिढ्या व्यवसाय सुरु आहे, त्याच काय होणार? ते आम्ही जाणार कुठे? इथे जसं आपण पाहतोय, येथे आपले हिंदी, ख्रिस्ती बांधव एकमेकांसोबत राहतात आणि प्रत्येक कोळीवाड्यात राहतात. आमच्या येथे वरळी कोळीवाड्यातही तसंच वातावरण आहे. तिथे देखील, सोमनाथ जिल्ह्यातून आलेले अनेक लोक आहेत. तीन-चार पिढ्या पूर्वी येथे ते आले होते. तिथे काही काही मुस्लीम, काही हिंदू बांधव आहे. सोमनाथ जिल्ह्यातून आल्यामुळे तिथे शंकराचे चांगले मंदिर आहे. पण आता चाललं काय सगळीकडे की, जेव्हाही आपण धारावी बद्दल बोलतो तेव्हा, भाजप एक प्रचार सुरु करते की, हे बांगलादेशींसाठी चाललं आहे. हे तर रोहिंग्यांसाठी चाललं आहे. भाजपला हे देखील माहित नाही की, रोहिंग्या बर्मा मधून येतात, बांगलादेशमधून नाही.” यावेळी आदित्य ठाकरे यांनी उपस्थित लोकांना प्रश्न विचारला की, तुमच्यात कोणी बांगलादेशी आहे का? त्यावेळी उपस्थित लोकांनी नाही म्हणून उत्तर दिलं. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “मग भाजपला तुम्ही बांगलादेशी कसे वाटता? ते म्हणाले, हा प्रचार करून (भाजपने) मुंबईत संपूर्ण वातावरण बिघडवायचं. मुंबईत वातावरण तुमच्या विरुद्ध करायचं आणि तुम्हाला लवकर येथून बाहेर काढण्यास भाग पडायचं, हे कट कारस्थान आपल्याला हाणून पाडावेच लागेल.”
ते म्हणाले, “मध्ये मेगवाडीत सर्वे झाला. या सर्वेवर काही ठरावी लोकांनी विश्वास ठेवला की, काहीतरी चांगलं होतंय. वर्षानुवर्षे आपण येथे राहिलो आहे, काहीतरी चांगलं होईल आपल्याला खोली तरी, मिळेल. मात्र जेव्हा सर्वे झाला ते जाणून तुम्हाला धक्का बसेल. 80 टक्केहून जास्त लोक अपात्र ठरवली. सगळे मला सेनाभवनात भेटायला आले. त्यावेळी ते म्हणाले, साहेब आम्ही तर येथे आधीपासून राहत आहोत. संपूर्ण पिढी माझी येथेच गेली. माझे पणजोबा येथे आले. माझे आजोबा येथे होते. मीही येथेच लहानाचा मोठा झालो. तर मी कसा येथे अपात्र झालो. मी त्यांना हेच विचारलं तू अपात्र होण्यसाठी तू काय केलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगली की, मी तर अदानी आणि सरकारवर विश्वास ठेवला. म्हणजे ज्या सरकारवर आपण विश्वास ठेवतोय तेच सरकार आपलं विश्वासघात करतोय.”
आदित्य ठाकरे म्हणाले, “याच धारावीत अदानी समूह आणि सरकार मोठमोठे टॉवर आणतील. हे टॉवर आणल्यावती तुम्हाला काय सांगणार तर, जेव्हा पीयूष गोयल खादारकीची निवडणूक लढवत होते. त्यावेळी ते तिथे फिरत असताना कोळीवाड्याच्या समोर गेले आणि नाकावर रुमाल घेतला. ते म्हणाले की, खूप घाण वास येतोय, हे सगळं येथून काढून टाका. आपापल्या मुंबईचं हे दुर्दैव आहे की, कोळीवाड्यांसाठी प्रत्येक ठिकाणी आपल्याला लढा द्यायला लागतोच. मुंबई आपलीच असताना सगळे आपल्यावरच येतात आणि आपल्यावरच का येतात, हे आपल्याला काळात नाही आहे. मागचं फेकनाथ मिंधे यांचं सरकार होतं. त्यांनी देखील एक हाउसिंग पॉलिसी काढली होती. त्यावेळी त्यांना विरोध करणारा एकमेव आणि पहिला पक्ष हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष होता. कोळीवाड्याचे डेव्हलपमेंट ठीक आहे आणि ते झालेच पाहिजे. मात्र कोळीवाड्याचे क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ शकतं का? एआरएला दुसरं जे गोंडस नाव दिलं जातं त्याला ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ म्हणतात. जे आपलं आता अनेक एकरांवर पसरलेले कोळीवाडे आहेत, बैठे घरे, बंगले, वस्तू आणि जी मंदिरे आहेत. तुम्ही मला सांगा (कोळीवाड्यातील नागरिक) क्लस्टरच्या नावाखाली तुम्ही 305 मध्ये जाऊ शकता का? मासे घेऊन आल्यानंतर ड्राई डॉकिंग आपल्या बोटीच होतं. पण मच्छी आपण सुकायला टाकतो, ती टाकणार कुठे, ठेवणार कुठे? आता जे मार्केट पाहिलं आपण, ते आधी काढायला येतील आणि हे प्रायव्हेट मार्केट आहे. मला वरळीतही असं करायचं आहे, आपण करू ते एकत्र. मात्र येथे टॉवर आल्यानंतर तुम्हाला काढला अबादिडीत करून घ्यायचे आहेत ते आताच करून घ्यावे लागतील. आता जर ही वेळ निघून गेली तर कधी पुन्हाही वेळ हाती लागणार नाही.”
ते पुढे म्हणाले की, “धारावीच्या नावाखाली जी काही लूट चालू आहे. अदानी समूह मुंबईची लूट करत आहे. भयानक परिस्थिती आहे. मला माहित नाही, तुम्हाला येथे किती लोकांना माहित आहे. आपलं धारावी जे धारणा 300 एकरवर पसरलं आहे, पुनर्विकास करायचा आहे, हे मी अनेक वर्ष ऐकता आहे. पुनर्विकास 100 टक्के झाला पाहिजे. चांगली घरे मिळाली पाहिजेत. रस्ते चांगले मिळाला पाहिजेत. आता अनेक लोक मला सांगत होते की, आमच्याकडे पाण्याच्या पाईपलाईनची समस्या आहे. गटाराच्या लाईनची समस्या आहे, ते नीट झालंच पाहिजे. मात्र हे होताना विकास आपला होतोय की, अदानी समूहाचा होत आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपलं सरकार असताना जेव्हा आपण टेंडर काढत होतो, तेव्हा कदाचित अदानी यांनाही मिळालं असतं किंवा दुसऱ्या कोणाला मिळू शकलं असतं. पण जी लूट चालू आहे, ती आपण करू दिली नसती. आपल्या धारावीचा विकास करणार हे सांगून, अदानी काय काय मुंबईतून घेऊन जात आहेत, माहित का? मुंबईत आपल्या 300 एकरचा धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी बाजूला 250 एकरचा प्लॉट दिलेला आहे. एवढं पाहिलं तर, तेवढं पुरेसं आहे. पण तेवढ्यावर भूक भागात नाही. मग 540 एकर, म्हणजे 300 एकर प्लस 250 एकर हे तर धारावीत मिळालेच आहे, त्यांना बाहेर देखील अजून 600 एकर मिळाले आहेत. कुर्ला, मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, मोठाघरमध्ये डंपिंग ग्राउंडवर आणि जिथून येथून सगळ्या कोणाला जे पाठवणार आहे, ट्रान्झिटच्या नावाखाली ते कुठे पाठवणार आहेत माहित आहे का? तर कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर देवनारमध्ये. तो ढिगारा साफ कार्याला मुंबई महानगरपालिकेकडून जागा हडपली तर हडपली पण मुंबई महानगरपालिका तुमचे आमचे पैसे वापरून तो ढिगारा साफ करणार, कोण तर, अदानी. कंपनी कोणाची अदानीची, जमीन कोणाची, अदानीची कचरा कोणाचा, अदानीचा. आता तो साफ कोण करणार तर मुंबईकर करणार.”
आदित्य ठाकरे म्हणाले, “पुनर्विकास होत असताना तुम्ही मला सांगा तुम्ही आम्ही जर आज या राज्य सरकारकडे गेलो, नगरविकास खात्याकडे गेलो किंवा मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो आणि सांगितलं की, मुख्यमंत्री महोदय आम्ही येथे चार पिढ्या, पाच पिढ्या राहतोय. आम्ही मूळ मुंबईकर आहे. मुंबईवर मालकी हक्क आमचा आहे. कोळी बांधांवांचा आहे. आम्हाला एक स्क्वेअर फूट जागा फुकटात द्या. मग जर आपल्याला एक स्क्वेअर फूट जागा फुकटात मिळत नसेल तर, मग अदानींना आपला विकास करायचा म्हणून त्यांना 1600 एकत्र जागा का मिळत आहे? बरं 1600 एकर मिळतायत ते मिळतायत, यांच्यात अनेक गोष्टी ज्या बागीच्या मिळाल्यात ते तर भयानक आहे. कुठेही विकास करत असताना, ज्यांची जमीन असते त्यांना आपल्याला प्रीमियम भरा लागारतो. तसं पाहायला गेलं तर, धारावीत 70 टक्के जमीन ही बीएमसीची राहिलेली आहे. श्रद्धा जाधव आपण महापौर राहिल्या आहेत. बीएमसीकडून यांनी असा कारभार करून घेतला आहे की, बीएमसीत कुठलाही कायदा पास करत असताना जनरल बॉडीमध्ये जायला लागतं, नगरसेवकांची मान्यता लागते. मग कमिट्यांची मान्यता लागते. महापौरांची मान्यता लागते. पण तीन वर्ष निवडणूक याचसाठी घेतल्या नाही, कारण यांना अदानींची सेवा करायची होती. मुंबईची सेवा नव्हती करायची. धारावीचा विकास करण्यासाठी जो प्रीमियम लागतो साडेसात हजार कोटींचा, तो देखील माफ केला आहे. हा प्रीमियम मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत येणार होता. यामुळे आपल्याला मोफत, शाळा, दवाखाने, बस सेवा, रस्ते बांधणी, फुटपाथ बांधणी, पाण्याचा पुरवठा, विजेचा पुरवठाहे सगळं करण्याचं साधन मिळतं, तेच यांनी आपल्याकडून हिसकावून घेतलं आहे. टीडीआरचा घोटाळा असतो, कुठेही तुम्हाला इमारत बांधायची असते, एफएसआय संपल्यानंतर टीडीआर घेतो. पण मुंबईमध्ये धारावीचा विकास करायचा आहे म्हणून जवळपास 40 टक्के पहिला टीडीआर हा अदानींकडूनच घ्यायला लागतो. जर अदानी यांना 1600 किंवा 1700 एकर जागा मुंबईत फूट मिळत असेल, जर अदानींना साडेसात हजार कोटींचा प्रीमियम फक्त बीएमसी माफ करत असेल, बाकीचे प्रीमियम तर, वेगळेच. जर अदानींना पहिले 40 टक्के टीडीआर आपल्याला कंपल्सरी भरायलाच लागत असेल, जर अदानींना हे सगळं मोकळं करून आपल्याला बाहेर ढकलून 300 – 400 एकर तर येथे आणि बाकी सगळीकडे अनेक ठिकाणी सेल टॉवर बांधायला आणि लाखो कोटी कम्बायला जर पैसे मिळत असतील, मग दहावी मधल्यानी सांगितलं की, आम्हला धारावीमधेच राहायचं आहे. येथेच आमचा पुनर्विकास झाला पाहिजे, तर काय आपण चुकीचे मागत आहोत का? हा लढा यासाठीच आहे.”
‘जे कोणी माझी मुंबई लुटेल, त्यांना मी नाडणार म्हणजे नाडणारच’
अदानी समूह आणि सरकारवर हल्लाबोल करत ते म्हणाले, “मी कोळीवाड्यात आलो मी लेबर कॅम्पमध्ये गेलो, परत एकदा मार्केटमध्ये येणार आहे. या सगळ्या गोष्टी असताना मी एवढंच विचारात आहे की, अदानी समूहाला, अदानी समूह म्हणजे वैयक्तिक भांडणे नाहीये. पण ग्रुपशी भांडण आहे. जे कोणी माझी मुंबई लुटेल, त्यांना मी नाडणार म्हणजे नाडणारच. आज मी त्यांना विचारात आहे की, कुंभारवाड्याचा कसा तुम्ही विकास करणार? याचा काय प्लॅन आहे, तो येथे येऊन लोकांना समउं दाखवा तरच आम्ही तुम्हाला मान्यता देऊ. नाहीतर, आम्ही तुम्हाला येथे येऊ देणार नाही.”
Comments are closed.