धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल संघांनी फर्स्ट टेक चॅलेंज वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये रचला इतिहास

मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या टीम मॅट्रिक्स आणि टीम युरेका या दोन्ही रोबोटिक्स संघांनी ह्युस्टन येथे झालेल्या फर्स्ट टेक चॅलेंज वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये ऐतिहासिक यश मिळवले. दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश करत एकमेकांविरुद्ध फायनल खेळली. टीम मॅट्रिक्सने ओचोआ डिव्हिजन जिंकत अंतिम फेरीत एडिसन डिव्हिजन विजेता टीम युरेकाला पराभूत केले. मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानातील कोणत्याही संघाने पहिल्यांदाच एफटीसी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आहे. ह्यूस्टन टेक्सास येथील जॉर्ज आर. ब्राउन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये फर्स्टद्वारे (For Inspiration and Recognition of Science and Technology) आयोजित या स्पर्धेत 30 हून अधिक देशांतील 256 संघानी भाग घेतला होता. यात 50,000 हून अधिक प्रेक्षक सहभागी झाले होते.
Comments are closed.