कचऱ्याचा ढिगारा आणि राजकीय होर्डिंग्जमुळे मुंबई विद्रुप, कारवाईसाठी आदित्य ठाकरे यांचे BMC आयुक्तांना पत्र
मुंबईला विद्रुप करणाऱ्या कचरा व्यवस्थापनातील ढिसाळपणा आणि नाक्यानाक्यावर उभारले जाणारे बेकायदेशीर राजकीय होर्डिंग्ज, यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे.
पालिका आयुक्तांना लिहिलेल्या आदित्य ठाकरे म्हणाले की, “गेले दोन वर्षे आम्ही पाहत आहोत की मुंबईत अनेक गल्लींमधला कचरा वेळीच उचलला जात नाही. जे जवळपास १५ वर्षे होत नव्हतं, ते आता घडत आहे. कचरा साठून राहतो. अडगळीत नाही तर अनेक नाके, महत्त्वाचे रस्ते, धार्मिक स्थळे, इमारतींच्या बाहेर कचऱ्याचे ढीग दिसतात. आपल्याला विचारायचे होते की काय झाले? यंत्रणा बदलली आहे का? की ठेकेदार बदलला आहे? महापालिकेला दुसरे काम दिले आहे का? नेमके असे काय झाले आहे, की संपूर्ण मुंबईत कचरा आणि डेब्रिस वेळीच उचलले जात नाही?”
ते पुढे म्हणाले की, “दुसरा महत्त्वाचा विषय राजकीय होर्डिंग-बॅनर्सचा आहे. मला आठवतं की काही वर्षांपूर्वी कोर्टाने सर्व बेकायदेशीर होर्डिंग-बॅनर्सवर बंदी आणली होती. महापालिकेने त्या ऑर्डरचा अर्थ, फक्त विरोधी पक्षाचे होर्डिंग काढा, असा काढल्याचे दिसते. मंत्री व त्यांच्या चेले असतील तर किमान दोन आठवडे होर्डिंग राहू द्या, आता कुठले परदेशी पाहुणे असतील तर सरकार स्वतःच सर्रास बेकायदेशीर होर्डिंग्स लावून शहर अधिकच विद्रूप करते आणि महापालिकेकडून फक्त विरोधी पक्षाच्या आणि मंडळांच्या होर्डिंगवरच कारवाई होते. खरं तर मी मुख्यमंत्री साहेबांनाही पत्र लिहिले होते, ही रेस थांबवूया. तुम्ही सांगा होर्डिंग लावणार नाही. आम्ही देखील पूर्ण बंद करू. पण काही उत्तर आले नाही. असो, अपेक्षा करतो की, आपल्याकडून उत्तर मिळेल आणि कारवाईही होईल. आपण दोघेही मुंबईकर आहोत, मुंबईप्रेमी आहोत.”
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी ह्यांना पत्र लिहून, मुंबईला विद्रुप करणाऱ्या कचरा व्यवस्थापनातील ढिसाळपणा आणि नाक्यानाक्यावर उभारले जाणारे बेकायदेशीर राजकीय होर्डिंग्ज; ह्या दोन समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले.
ह्या विषयांचे गांभीर्य पाहता, आयुक्त तातडीने ठोस कारवाई… pic.twitter.com/yNH8ND1330
— Aaditya Thackeray (@AUThackeray) 5 डिसेंबर 2025
Comments are closed.