धक्कादायक! चक्क न्यायाधीशांनीच केले अमली पदार्थांचे सेवन, शिस्त पालन समितीकडून बडतर्फीची कारवाई
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी फेटाळून लावले: मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या शिस्त पालन समितीने इरफान शेख (Judge Irfan Shaikh Suspended) नावाच्या न्यायाधीशांना (Judge) बडतर्फ केले आहे. पोलिसांनी जप्त केलेले अमली पदार्थ ज्यांच्या ताब्यात ठेवले जातात, त्याच न्यायाधीशांनी चक्क अमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळून आले आहे. हा प्रकार मुंबईतील बहुचर्चित कॉर्डेलिया क्रुझ प्रकरणाशी संबंधित आहे. फिल्म स्टार आर्यन खानला (Aryan Khan Drugs Case)एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या टीमने कॉर्डेलिया क्रूजवरुन अटक केली होती, त्यावेळी इरफान शेख हे न्यायाधीश देखील क्रूजवर होते. इरफान शेख यांनी त्यावेळी अमली पदार्थांचे सेवन केले होते. समीर वानखेडे यांच्या टीमने इरफान शेख यांना वाचविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना गुपचूपपणे रुग्णालयात दाखल केले, असे समोर आले आहे.
Mumbai High Court Judge Dismissed : इतर आरोपीप्रमाणे अटकेची कारवाई का नाही?
अशातच, उपचारादरम्यान त्यांनी कोकेन या अमली पदार्थांचे सेवन केल्याचे उघड झाले. माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी इरफान शेख यांच्या चाचण्यांचे रिपोर्ट मिळवून कारवाईची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर शिस्त पालन समितीच्या चौकशीत इरफान शेख दोषी आढळले. दरम्यान या प्रकरणी आता एबीपी माझाने काही सवाल उपस्थित केले आहेत. इरफान शेख यांनी अमली पदार्थांचे सेवन केले होते तर त्यांच्यावर इतर आरोपीप्रमाणे अटकेची कारवाई का नाही? इरफान शेख यांना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या समीर वानखेडे यांच्या टीमवरती कोणती कारवाई होणार? इत्यादी महत्वाचे प्रश्न या निमित्याने उपस्थित झाले आहे.
Mumbai Cruise Drugs Case : कॉर्डिलिया क्रूझ प्रकरण नेमकं काय?
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. कॉर्डिलिया क्रझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली आहे. सबळ पुराव्यांअभावी या सहा जणांना निर्दोष सोडण्यात आलं आहे. या प्रकरणी आता केवळ 14 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=ehldh9tw6zq
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.