परदेशात जायचे तर 60 कोटी भरा; हायकोर्टाचे आदेश

कौटुंबिक सहलीनिमित्त परदेशात जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करत हायकोर्टात धाव घेणाऱ्या राज कुंद्रा व अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा देण्यास नकार देत खडे बोल सुनावले. आर्थिक फसवणुकीचा आरोप असलेल्यांना परदेशात फिरायला जाण्याची परवानगी देता येणार नाही. परदेशात जायचेच असेल तर आधी 60 कोटी कोर्टात जमा करा, नंतर तुमच्या विनंतीवर विचार करू, असे हायकोर्टाने दोघांना सुनावले.  आर्थिक फसवणूकप्रकरणी राज पुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरोधात आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने लुकआऊट नोटीस जारी केली आहे.

Comments are closed.