चॅम्पियन मुंबई इंडियन्सवर पैशांचा पाऊस! उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला किती मिळाली बक्षिस रक्कम?

यंदाच्या महिला प्रीमियर लीगचा फायनल सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कपिटल्स संघात खेळला गेला. (Mumbai Indians vs Delhi Capitals WPL Final) या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि ट्राॅफीवर नाव कोरले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 149 धावा केल्या, प्रत्युत्तरात दिल्लीला फक्त 141 धावा करता आल्या. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया की, विजेत्या मुंबई इंडियन्सला आणि उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला किती बक्षीस रक्कम मिळाली.

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या फायनल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी कसून गोलंदाजी केली पण मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने 66 धावा करत संघाला 149 धावांच्या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. हरमनप्रीतने आपल्या खेळीत 4 चौकारांसह 2 षटकार ठोकले.

डब्ल्यूपीएलच्या या रोमांचक फायनल सामन्यात दोन्ही संघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी शेवटच्या षटकापर्यंत झुंज दिली. मॅरिझाने कॅपने 40 धावा आणि निक्की प्रसादने 25 धावा करत दिल्लीला सामन्यात टिकवून ठेवले पण शेवटी त्यांना यश आले नाही. मुंबई इंडियन्सने 8 धावांनी सामना जिंकला.

महिला प्रीमियर लीग 2025: विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि उपविजेता संघ दिल्ला कॅपिटल्स संघांना मिळालेली बक्षीस रक्कम!

विजेता संघ मुंबई इंडियन्स- 6 कोटी
उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्स- 3 कोटी

Comments are closed.