कामाठीपुऱ्यात बांगलादेशी ‘लाडकी बहीण’, क्राइम ब्रँचकडून पाच जणांना अटक

देशाच्या अनेक भागांत बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या राहत असल्याचे प्रकार दररोज समोर येत असताना आता कामाठीपुऱ्यामध्ये चक्क बांगलादेशी महिलेने ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत क्राइम ब्रँचने कारवाई करून पाच जणांना कामाठीपुऱ्यातून अटक केली आहे.

मिंधे-भाजप सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना आणली. या योजनेला राज्यभरात प्रचंड प्रतिसादही मिळाला, मात्र या योजनेचा लाभ बोगस कागपत्रांच्या माध्यमातून घेतल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. यातच आता चक्क बांगलादेशी महिलेने या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. यामुळे ‘लाडकी बहीण’ योजना वादात सापडली आहे.

बनावट आधारकार्डने घेतला लाभ

क्राइम ब्रँचने अटक केलेल्यांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. यामध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतलेल्या महिलेने बोगस आधारकार्डच्या माध्यमातून निधी लाटल्याचे समोर आले आहे.

Comments are closed.