Mumbai Local News – रेल्वे रुळ ओलांडताना झालेल्या अपघातामुळे मध्य रेल्वेची CSMT च्या दिशेने वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

भायखळा आणि चिंचपोकळी स्थानकादरम्यान रेल्वे रुळ ओलांडताना एका व्यक्तीचा भीषण अपघात झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या दुर्दैवी अपघातात संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तात्काळ बचाव कार्य सुरू केले. या अपघातामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी धीम्या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती.

सध्या विस्कळीत झालेली वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. सध्या CSMT कडे जाणारी धीम्या मार्गावरील सेवा ३० मिनिटे उशिराने सुरू करण्याचे प्रयत्न रेल्वेकडून केले जात असले, तरी प्रत्यक्षात गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. अचानक झालेल्या या खोळंब्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून, वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Comments are closed.