छोटी बातमी – आज शिवसम्राट श्री
मालाड – शिवसम्राट व्यायाय मंदिर आयोजित ‘शिवसम्राट श्री’ शरीररसौष्ठव स्पर्धा शनिवारी मालाड पूर्वेला पुरार गावातील बाणडोंगरी येथे रंगणार आहे. मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेत 55, 60, 65, 70, 75 आणि 75 किलोवरील असे एपंदर सहा गट खेळतील. स्पर्धेला शिवसेना नेते, आमदार अॅड. अनिल परब, आमदार सुनील प्रभू आणि विभागप्रमुख अमोल कीर्तीकर यांची उपस्थिती लाभेल, अशी माहिती शिवसम्राटचे सचिव काशिनाथ गायकवाड यांनी दिली.
चेन्नई पोर्टचा मोठा विजय
चेंबूर – 44 व्या अखिल हिंदुस्थानी मेजर पोर्ट्स क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱया दिवशी सामने एकतर्फी ठरले. कर्नाटक क्रिकेट ग्राऊंडवर चेन्नई पोर्टने जवाहरलाल नेहरू पोर्टला नमवले. रितिक ईश्वरनच्या 29 चेंडूंतील झंझावाती 103 धावांची खेळी टार्ंनग पॉइंट ठरली. न्यू मंगळूर पोर्टने विशाखापट्टणम पोर्टवर 9 विकेट्सनी विजय मिळवला. मृणाल पुमार यांनी 102 धावा व 3 विकेट घेत चमक दाखवली. आरसीएफ मैदानावर एसएम पोर्ट प्राधिकरणाने (कोलकाता) डीपीए कांडलावर 3 विकेट्सनी मात केली.
Comments are closed.