Mumbai Metro lines gets green light for full speed operations asj
मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे मुंबई मेट्रो आता ताशी 80 च्या वेगाने धावणार. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी केलेल्या निरीक्षणानंतर मुंबई पश्चिम उपनगरात धावणाऱ्या मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 मार्गावरील नियमित संचालनासाठी सुरक्षा प्रमाणपत्र दिले. त्यामुळे आता 50 ते 60 किमी प्रतितास धावणाऱ्या मुंबईच्या या दोन्ही मेट्रो ताशी 80 किमी वेगाने धावणार आहेत. यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार असून मुंबईकरांचा प्रवास लवकर पूर्ण होऊ शकतो. या दोन्ही मार्गांचे संचालन MMRDA च्या हाती आहे. (Mumbai Metro lines gets green light for full speed operations)
हेही वाचा : Transport Minister : या वर्षात 2640 नव्या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील; सरनाईकांची माहिती
– Advertisement –
मुंबई मेट्रो 7 लाईन ही 16.5 किलोमीटर लांबीची असून ही लाईन अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या स्थानकांना जोडतो. तसेच, या लाईनवर एकूण 13 स्थानके आहेत. तर मेट्रो लाईन 2 अ ही दहिसर ते अंधेरी डीएन नगर अशी दुसरी लाईन असून हा मेट्रो मार्ग एकूण 18.6 किमी लांबीची आहे. या मार्गावर एकूण 17 स्थानके आहेत. या दोन्ही मेट्रो मार्गांवर दररोज अंदाजे अडीच लाख प्रवासी प्रवास करतात. मेट्रोचा वेग वाढल्याने प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. MMRDA ने या दोन्ही मार्गांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून यामध्ये ड्रायव्हरलेस ट्रेनसेट्स, सीबीटीसी सिग्नलिंग, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे आणि नाविन्यपूर्ण तिकीट प्रणालींचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, “मेट्रो लाइन 7 आणि 2 ए साठी मिळालेली नियमित मंजुरी हे मुंबईला कार्यक्षम वाहतूक व्यवस्थेसह जागतिक दर्जाचे शहर बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था शहराच्या विकासाचा आधारस्तंभ करण्याचे आमचे वचन या विकासाच्या माध्यमातून पूर्ण करत आहोत.” असे सांगितले. तर, “मेट्रो विस्तारामुळे शहरात मोठा बदल घडत असून मेट्रो लाइन 7 आणि 2 ए साठी मिळालेली नियमित मंजुरी ही एमएमआरडीएच्या वचनबद्धतेचा दाखला आहे. यामुळे महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल तसेच प्रवाशांच्या जीवनमानात सुधारणा होईल. वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मेट्रो नेटवर्कचा आणखी विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत.” अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
Comments are closed.