Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज
Mumbai MNS : मुंबईत मनसेला सोबत घेतल्यास मविआला मोठा फायदा होण्याचा अंदाज
मुंबईत काँग्रेस पक्ष मनसेला नवा भिडू म्हणून महाविकास आघाडीत समाविष्ट करुन घेण्यास तयार नाहीय…मात्र मनसेविना मुंबईत मविआचा खेळ जमेना अशी म्हणण्याची वेळ आलीय….२०२४ च्या निवडणुकांची आकडेवारी बघितल्यास मनसेला सोबत घेतल्यास महाविकास आघाडीला मोठा फायदा होणार असल्याचं दिसून येतंय..मुंबई महापालिकेच्या २२७ पैकी २२ वॉर्डात मनसेच्या मतांचा मविआला फायदा होईल असं चित्र आहे…..दिंडोशी,गोरेगाव, वर्सोवा, जोगेश्वरी पूर्व, विलेपार्ले, कलिना, भांडुप, घाटकोपर पश्चिम, अणुशक्ती नगर, चांदीवली, माहीम या विधानसभा मतदारसंघातील 22 वॉर्डात मनसेच्या मतांचा मविआला फायदा होऊ शकतो असा अंदाज आहे…त्यामुळे मनसेबाबत सकारात्मक नसलेल्या काँग्रेसला आपला विरोध बाजूला ठेवत मनसेला सोबत घ्यावं लागलंतय की मनसेबाबत सकारात्मक असलेले उद्धव ठाकरे आणि शरद पवार दुसरी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे…
Comments are closed.