मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढणार; सध्या असलेले सर्व आरक
मुंबई मुन्किपल कॉर्पोरेशन निवडणूक 2025 मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) प्रभाग आरक्षण कार्य प्रणालीबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने काढण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करून प्रभाग आरक्षण काढलं जाणार आहे. अधिसूचना जारी करून पालिकेला आदर्श कार्यप्रणाली नेमून देण्यात आली आहे.
अनुसूचित जमाती, महिला आणि खुला प्रवर्गाच्या 17 जागा, तर अनुसूचित जमातीच्या 02 जागा आणि इतर मागासवर्गीयांच्या 61 जागा यांचे महिला आणि पुरुष, असे आरक्षण काढले जाईल. त्यानंतर उर्वरित सर्वसामान्य गटातील प्रभागाचे आधी महिला प्रवर्ग यांचे आरक्षण काढून उर्वरित सर्व प्रभाग खुला प्रभाग म्हणून जाहीर करण्यात येईल. चक्राकार पद्धतीमुळे सध्या असलेले सर्व आरक्षित प्रभाग बदलले जाणार आहे.
227 विभाग
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सध्या वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपूर्वी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची (Local Bodies Election) प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभाग रचनेस (Prabhag Rachana Mumbai BMC) राज्य निवडणूक आयोगाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेत सद्यस्थितीत कोणाकडे किती माजी नगरसेवक? (मराठी vs Uddhav Thackeray)
मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार अपक्ष नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर एकूण संख्या 88 नगरसेवकांची झाली. नंतर शिवसेनेने मनसेचे सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ही संख्या 94 झाली. त्यानंतर जात पडताळणी आणि पोटनिवडणुकीमध्ये 2022 पर्यंत मुदत संपेपर्यंत शिवसेनेचे आणखी पाच नगरसेवक वाढले. शिवसेनेचा नगरसेवकांची संख्या 99 झाली. शिवसेनेमध्ये झालेला पक्ष फुटी नंतर एका मागे एक 2017 साली निवडून आलेले नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायला लागले.सद्यस्थितीत एकूण 44 माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे तर 55 माजी नगरसेवक हे आता ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.