मुंबई महापालिकेत तीन नव्या सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती

मुंबई महापालिकेने तीन नव्या सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती केली असून अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या उपायुक्तांकडून कार्यभार काढून घेतला आहे. मुंबई पालिकेच्या पी-उत्तर विभागात कुदन वळवी, एफ-उत्तर विभागात नितीन शुक्ला तर बी विभागात शंकर भोसले यांची सहाय्यक आयुक्तपदावर नेमणूक केली आहे तर उपायुक्त किरण दिघावकर, संतोषकुमार धोंडे आणि पृथ्वीराज चौहान यांच्याकडे असलेला सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गेल्या वर्षी नऊ प्रशासकीय अधिकाऱयांना अतिरिक्त कार्यभार देऊन प्रशासकीय जबाबदाऱया दिल्या होत्या.

Comments are closed.