मुंबई महापालिकेला पुन्हा धमकीचा मेल; महापौर कार्यालयासह मेट्रो स्टेशन, अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचा उल्लेख

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई महापालिकेला पुन्हा धमकीचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिकेच्या आयडीवर गुरुवारी सकाळी 10.12 वाजता हा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये महापौर कार्यालयासह महानायक अमिताभ बच्चन यांचा जलसा बंगला उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मेल प्राप्त झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये आल्या असून महापालिका परिसरासह मेलमध्ये उल्लेख केलेल्या अन्य परिसराची कसून तपासणी सुरू आहे.

टीव्ही मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, मेलमध्ये महालक्ष्मी, सायन्स आचार्य मेट्रो स्टेशन देखील बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांत पाच वेळा धमकीचे मेल आल्याने महापालिका आणि मुंबई पोलीस काय ठोस उपाययोजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टालाही बॉम्बची धमकी

पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. ई-मेल बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणांनी कोर्ट परिसरात तपास सुरू केला आहे.

Comments are closed.