Mumbai Municipal Corporation will provide food safety and hygiene lessons to 10,000 street food vendors rrp
महापालिका हद्दीतील 10 हजार परवानाधारक खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न स्वच्छतेच्या पद्धती, अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी आणि साठवणूक प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) यांच्यात सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईत रस्त्यावर खाद्यपदार्थ शिकविण्यास मनाई आहे. त्यामुळेच मुंबई महापालिका एकीकडे रस्त्यांवरील फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई करते, तर दुसरीकडे सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील जोखीम कमी करण्यासाठी आणि मुंबईकर नागरिकांना दूषित, अनारोग्य अन्न सेवनापासून परावृत्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. (Mumbai Municipal Corporation will provide food safety and hygiene lessons to 10,000 street food vendors)
महापालिका हद्दीतील 10 हजार परवानाधारक खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न स्वच्छतेच्या पद्धती, अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी आणि साठवणूक प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) यांच्यात सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला आहे. याअंतर्गत खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न सुरक्षेचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता, विक्रीच्या ठिकाणची स्वच्छता आणि सज्जता, अन्न शिजवणे किंवा पाककृती करणे, कचरा व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाची माहिती सोबतच प्रभावी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
– Advertisement –
हेही वाचा – Vadapav Price Hike : गरिबांचा घास महागणार; बेकरी चालकांमुळे वडापावची किंमत वाढण्याची शक्यता
मुंबई महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त सभागृहात झालेल्या सामंजस्य करारप्रसंगी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. कमलवर्धन राव, पश्चिम विभागाच्या संचालक प्रीती चौधरी, सहसंचालक डॉ. के. यू. मेथेकर यांच्यासह उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा आदी उपस्थित होते.
– Advertisement –
खाद्य विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे महापालिकेचे कर्तव्य – आयुक्त
दरम्यान, महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी म्हणाले की, मुंबईची ओळख अविरत कार्य करणाऱ्यांचे महानगर अशी आहे. रस्त्यावरील खाद्य पदार्थ आणि मुंबईकरांचे अतूट नाते आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या आरोग्यासाठी खाद्य विक्रेत्यांना प्रशिक्षण देणे, ही महापालिकेचे कर्तव्य आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्याकामी महापालिका सर्वोतोपरी सहकार्य करेल. मुंबईतील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी नागरिकांना स्वच्छ, ताजे अन्न पुरवावे, यासाठी परवानाधारक खाद्य विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचा फायदा खाद्य विक्रेत्यांनी घ्यावा. या प्रशिक्षणामुळे मुंबईकरांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत मिळणार आहे. व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छतेची खबरदारी घेतल्यामुळे नागरिकांना गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थ उपलब्ध होतील. या सामंजस्य करारानुसार, मुंबई महापालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण सत्रे नियमित अंतराने वर्षभर आयोजित करण्यात येणार आहेत.
हेही वाचा – Passing Policy : 5 वी आणि 8 वीत नापास झालात तर…; केंद्रीय शिक्षण विभागाने बदलले नियम
Comments are closed.