कल्याणमध्ये 35 वर्षीय महिलेने 17 व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन; बाहेरून आली, लिफ्टमधून
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">कल्याण: कल्याण योगिधाम परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. योगिधाम परिसरात 35 वर्षीय महिलेने 17 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. खडकपाडा पोलिसांचा या घटनेचा तपास सुरू आहे. ही महिला लिफ्टमधून 17 व्या मजल्यावर जातानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
17व्या मजल्यावर जात असताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण योगिधाम परिसरात एका इमारतीच्या 17 व्या मजल्यावरून उडी मारत 35 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना काल (शनिवारी) सायंकाळच्या सुमारास घडली. ही महिला या इमारतीमध्ये राहत नसून ती बाहेरून इमारतीमध्ये आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. ही महिला लिफ्टने 17व्या मजल्यावर जात असताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत घटनेची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून ही महिला कुठे राहत होती? ती या इमारतीमध्ये का आली? या महिलेने आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेबाबत माहिती देताना योगिधाम फेडरेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी सांगितलं की, दुपारच्या सुमारास मला फोन आला होता. मी इमारतीजवळ येऊन पाहिलं तर एका महिलेने 17 व्या मजल्यावरून उडी मारली होती. नंतर माहिती घेतली असता, ती अनोळखी महिला होती. ती बाहेरून आली होती. ती येथील रहिवासी नाही, अशी माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
या कॉम्प्लेक्समध्ये ही महिला बाहेरून आली होती. ती अगदी शांतपणे लिफ्टमधून 17व्या मजल्यावर जात असताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. त्यानंतर तिने उडी मारून आपलं जीवन संपवलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. खडकपाडा पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत घटनेची नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून ही महिला कुठे राहत होती? ती या इमारतीमध्ये का आली? या महिलेने आत्महत्या का केली? याचा तपास पोलीस करत आहेत.
Comments are closed.