पूर्व-पश्चिम दुतगती महामार्ग होणार चकाचक, मार्गावरील बस थांबे, दुभाजक, पदपथावरही स्वच्छता

मुंबईतील रस्ते, गल्लीबोळामध्ये स्वच्छतेबरोबर आता सोमवारपासून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची विशेष स्वच्छता मोहीम मुंबई महापालिकेने हाती घेतली आहे. महामार्गावरील बस थांबे, दुभाजक, पदपथाबरोबर सांकेतिक चिन्हे, चौकातील फलक आणि दिशादर्शक फलक यांचीही स्वच्छता, रंगरंगोटी आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. ही मोहीम सोमवार, 17 ते शनिवार, 22 मार्चपर्यंत दररोज

मुंबईला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या द्रुतगती महामार्गांवर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. स्वच्छतेबरोबर महामार्गावर नियमित सुशोभीकरण आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिल्या आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेचा घनकचरा आणि वाहतूक पोलीस विभागाच्या समन्वयाने ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी जेटिंग, प्रेशर वॉशर, धूळ काढण्यासाठी यांत्रिक झाडूंचा (मेपॅनिकल स्पीकिंग मशीन) वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी दिली.

राडारोड्याबरोबर जुन्या वाहनांची विल्हेवाट लावणार

द्रुतगती महामार्गालगतच्या कचरा पेट्यांमधील कचरा आणि संकलित केलेला राडारोडा वाहून नेणे, रोपे आणि झाडांभोवतीच्या कुंपणाचा कचरा काढणे, झाडांच्या बुंध्याला चुना आणि गेरूचा वापर करून शास्त्राेक्त पद्धतीने रंगरंगोटी करणे, बस थांब्याच्या ठिकाणची आसन व्यवस्था, अडगळीतील वस्तू आणि कचरा हटवणे, कचरा पेटय़ांची स्वच्छता तसेच गरजेनुसार दुरुस्ती करणे, सार्वजनिक प्रसाधनगृह परिसरात नियमित स्वच्छता करणे, रस्त्यावर अडथळा ठरणाऱया जुन्या वाहनांचीही विल्हेवाट लावली जाणार आहे.

अनधिकृत होर्डिंगवरही होणार कारवाई

पदपथांचे पेव्हर ब्लॉक, दुभाजक विभागीय परिरक्षण खात्यामार्फत दुरुस्त करणे, दुभाजकांची रंगरंगोटी करणे, मोहिमेच्या काळात रस्त्यांना आणि पदपथ स्वच्छतेला अडथळा ठरणाऱया वाहनांना हटवणे, अनधिकृत फलक, जाहिरात फलक (हार्ंडग) काढण्याचे कामही या मोहिमेत केले जाणार आहे.

Comments are closed.