Mumbai News – किल्ला कोर्टाला बॉम्बची धमकी; कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही
मुंबईतील किल्ला कोर्टाला गुरुवारी बॉम्बची धमकी देण्यात आली. ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आली. या धमकीमुळे कोर्ट परिसरात एकच गोंधळ उडाला. बॉम्बची माहिती मिळताच बॉम्बशोधक व नाशक पथक, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. कोर्ट परिसराची कसून तपासणी करण्यात आली. मात्र तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. याप्रकरणी एफआयआर नोंदवला असून, ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू आहे.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अज्ञात व्यक्तीने हा ई-मेल पाठवला. या ई-मेलमध्ये न्यायालयाच्या आवारात बॉम्ब ठेवण्यात आला असून लवकरच त्याचा स्फोट होणार असल्याचा दावा करण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण न्यायालय परिसर सील करण्यात आला आणि कसून शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू न सापडल्याने अधिकाऱ्यांनी ही धमकी अफवा असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.
Comments are closed.