Mumbai News – उन्हाळी सुट्टीत मध्य रेल्वे 46 अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार; मुंबई-मडगावदरम्यान 20 सेवा

उन्हाळी सुट्टीतील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वे 46 अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. यापैकी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान 20 गाड्या, तर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते संत्रागाची दरम्यान 26 गाड्या चालवण्यात येतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन क्रमांक 01019 ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 5 एप्रिल 2026 ते 7 जून 2026 या कालावधीत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर रविवारी 00.55 वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी दुपारी 3.15 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01020 ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 5 एप्रिल 2026 ते 7 जून 2026 या कालावधीत मडगाव येथून दर रविवारी दुपारी 4.00 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 3.50 वाजता पोहोचेल.

सर्व अतिरिक्त विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवि आणि करमळी या ठिकाणी थांबे देण्यात येतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस- संतरागाछी – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक ट्रेन क्रमांक 01001 ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 21 एप्रिल 2026 ते 14 जुलै 2026 या कालावधीत, लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दर मंगळवारी रात्री 8.15 वाजता सुटेल आणि संतरागाछी येथे तिसऱ्या दिवशी 5.00 वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01002 ही साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 23 एप्रिल 2026 ते 16 जुलै 2026 या कालावधीत संतरागाछी येथून दर गुरुवारी दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी रात्री 11.45 वाजता पोहोचेल.

या गाड्यांना ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर येथे थांबे देण्यात येतील.

Comments are closed.