Mumbai News – बोरीवली स्थानकात प्रवासी आणि टीसीमध्ये राडा, मुजोर तरुणाकडून स्टेशन मास्तर कार्यालयात तोडफोड

बोरीवली स्थानकात प्रवासी आणि टीसीमध्ये जोरदार राडा पहायला मिळाला. सेकंड क्लास तिकिट काढून प्रवासी फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करत होता. बोरीवली स्थानकात टीसीने तिकिटाबाबत विचारणा करताच प्रवासी आणि टीसीमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. मारहाणीनंतर प्रवाशाने स्थानकातील स्टेशन मास्तर कार्यालयात तोडफोड केली. बोरीवली जीआरपी पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्रवाशाने केलेल्या मारहाणीत टीसीच्या शर्टची बटणं तुटली. प्रवाशालाही जखम झाल्याचे दिसून येत आहे. यानंतर प्रवाशाने स्टेशन मास्तरच्या कार्यालयात केलेली तोडफोड मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मुजोर प्रवासी जीआरपी कार्यालयातील खुर्ची, कॉम्प्युटरची तोडफोड करताना व्हिडिओत दिसत आहे. तसेच तरुणासोबत एक महिला रडताना दिसत आहेत. दुपारी 3 ते 3.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. बोरीवली जीआरपी पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Comments are closed.